Tata Altroz Stolen | टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली 'टाटा अल्ट्रोझ'ची झाली चोरी! पुढे काय झालं...

Tata Altroz : टाटा कार शोरूममध्ये (Tata car Showroom) 25 जानेवारी रोजी टेस्ट ड्राईव्हसाठी नेण्याच्या नावाखाली दोन चोरट्यांनी कारसोबत गोंधळ घातला. मात्र, कारमधील सुरक्षा वैशिष्टय़ांमुळे आरोपींनी ती कार वीरसावरकर कॉलनीत सोडली आणि त्यानंतर ती कंपनीकडे परत करण्यात आली. उज्जैन (Ujjain)येथील आगर रोड हा संघी ब्रदर्सच्या शोरूमचा पत्ता आहे. इथेच ही टाटा अल्ट्रोझ (Tata Altroz)चोरण्याची घटना घडली.

Tata Altroz stolen in the name of a test drive
टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली 'टाटा अल्ट्रोझ'ची झाली चोरी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • टेस्ट ड्राईव्हसाठी नेण्याच्या नावाखाली दोन चोरट्यांनी कारसोबत गोंधळ घातला
  • आरोपी आणि शोरूमचे कर्मचारी भैरवगड रोडवरील टेस्ट ड्राईव्हसाठी निघाले
  • तपासादरम्यान ही कार वीर सावरकर नगर येथे आढळून आली

Tata Altroz Stolen while Test Drive : उज्जैन :  पार्किंगमधून, घरासमोरून किंवा कार्यालयासमोरून कार चोरीला जाण्याची अनेक प्रकरणे आपण ऐकत असतो. मात्र चक्क शोरुममधूनच कर्मचाऱ्यांसमोर वाहन चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे. येथील आगर रोडवरील टाटा कार शोरूममध्ये (Tata car Showroom) 25 जानेवारी रोजी टेस्ट ड्राईव्हसाठी नेण्याच्या नावाखाली दोन चोरट्यांनी कारसोबत गोंधळ घातला. मात्र, कारमधील सुरक्षा वैशिष्टय़ांमुळे आरोपींनी ती कार वीरसावरकर कॉलनीत सोडली आणि त्यानंतर ती कंपनीकडे परत करण्यात आली. उज्जैन (Ujjain)येथील आगर रोड हा संघी ब्रदर्सच्या शोरूमचा पत्ता आहे. इथेच ही टाटा अल्ट्रोझ (Tata Altroz)चोरण्याची घटना घडली. शोरूम एक्झिक्युटिव्हने दोन खरेदीदारांना खरेदी करण्यापूर्वी टाटा अल्ट्रोझची (Tata Altroz test drive)चाचणी घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार घडून आला. (Tata Altroz stolen in the name of a test drive at Ujjain)

टेस्ट ड्राईव्हच्या निमित्ताने चोरी

ही घटना आगर रोड येथील संघी ब्रदर्सच्या टाटा शोरुममध्ये घडली. आरोपी आले आणि त्यांनी टेस्ट ड्राईव्हची इच्छा व्यक्त केली. टेस्ट ड्राईव्हसाठी सर्व औपचारिकता पूर्ण करून आरोपी आणि शोरूमचे एक्झिक्युटिव्ह विष्णू गोयल हे भैरवगड रोडवरील टेस्ट ड्राईव्हसाठी निघाले. काही अंतर गेल्यावर गाडीत काहीतरी गडबड असल्याचे गाडी चालवणाऱ्या तरुणाच्या लक्षात आले आणि त्यांनी विष्णूला ते तपासण्यास सांगितले. विष्णू कारमधून बाहेर पडताच दोन्ही आरोपी कारसह पसार झाले. तत्काळ डीलरशिपला कळवण्यात आले. यानंतर चिमणगंज मंडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

कार सोडून आरोपी फरार

26 जानेवारीला सकाळी तपासादरम्यान वीर सावरकर नगरमध्ये कार उभी असल्याचे कोणीतरी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस आणि कंपनीचे कर्मचारी गाडी परत घेण्यासाठी गेले. मात्र, दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. दोन्ही आरोपी कार शोरूममध्ये निरीक्षण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे वाचली कार

कंपनीच्या प्रादेशिक व्यवस्थापक रागिणी शाही यांनी सांगितले की, कार आता अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत. आरोपीने गाडी घेतली तेव्हा पुश बटण लावून गाडी सुरू केल्यानंतर त्याने ती कुठेतरी थांबवली असावी. त्यावेळी कारची सेन्सर चावी विष्णूकडे असल्याने चोरट्यांना ती पुन्हा सुरू करता आली नाही, त्यामुळे त्यांनी कार वीर सावरकर नगरमध्ये ठेवून पळ काढला. चिमणगंज मंडी पोलीस ठाण्यातील एसआय करण कुणावाल यांनी या घटनेतील चोरीची कार जप्त केल्याची माहिती दिली. कारसह पळून गेलेल्यांची नावे समोर आली आहेत. या प्रकरणाचा पोलिसांकडून लवकरच तपास पूर्ण केला जाईल.

अलीकडच्या काळात वाहनांमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांवर मोठा भर दिला जात आहे. अपघातादरम्यान, चोरी होऊ नये म्हणून आणि इतरही प्रसंगी वाहनमालकाची सुरक्षा सांभाळली जावी यासाठी वाहन उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांमध्ये नवनवीन सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश करत आहेत. टाटा अल्ट्रोझच्या कार लॉक, सेन्सर की आणि ऑटो कार स्टार्ट सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे कार सापडणे सोपे झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी