Budget 2022 : नवी दिल्ली : नवा टॅक्स स्लॅब काही नोकरदारांना फार खास आवडला नाही. या स्लॅबमध्ये फक्त ५ टक्के म्हणजेच २९.४ लाख करदात्यांनी कर भरला होता. परंतु २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५.८९ कोटी करदात्यांनी आयकर भरला आहे. यामध्ये करसवलतीच्या पर्याय काढल्याने नोकरदारांच्या बचतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकार नव्या अर्थसंकल्पात काही आकर्षक योजना बनवू शकते. काही अटींसह गृहकर्ज आणि करसवलतीची घोषणा या अर्थसंकल्पात होऊ शकते. नव्या अर्थसंकल्पाकडून वर्क फ्रॉम करणार्यांना खूप अपेक्षा आहेत. त्यांनाही या अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल असे सांगण्यात येत आहे. (Tax free work from home allowances for salaried employees likely in Budget)
सध्या आयकराची मर्यादा अडीच लाख रुपये इतकी आहे. गेल्या ८ वर्षात यात बदले झालेले नाहीत. शेवटची मर्यादा २ लाखांवरून अडीच लाखांपर्यंत करण्यात आली होती. आता पाच राज्यातील निवडणूक पाहता ही मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
वर्क फ्रॉम होम करणार्या कर्मचार्यांच्या या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. वर्क फ्रॉम होम मुळे कर्मचार्यांचा वीज, इंटरनेट, मोबाईल आणि इतर खर्च वाढले आहेत. तसेच कोरोना काळात आरोग्यावरही खर्च वाढले आहे. तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सरकार स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारहून १ लाख पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत बँकांनी व्याज दर कमी केले आहेत. तर पीपीएफवर फिक्स डीपॉजिटपेक्षा अधिक व्याज मिळत आहे. त्यामुळे नोकरादारांचा कल फिक्स डीपॉजीटकडे कमी झाला आहे. फिक्स डीपॉजिटकडे नोकरदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार तीन वर्षाच्या एफडीवर कर माफ करण्याची शक्यता आहे. सध्या पाच वर्षांच्या एफडीवर कर माफ आहे.
प्रोव्हिडंट फंडसाठी खासगी कर्मचार्यांच्या खात्यात कंपनी पैसे जमा करते तर कर्मचार्याच्या खात्यातून काही रक्कम पीएफ खात्यात जमा होते. सध्या अडीच लाखापर्यंत प्रोव्हिंडट फंडवर कर सवलत आहे, सरकार ही सवलत पाच लाख पर्यंत करण्याची शक्यता आहे.