Assam । नवी दिल्ली : आसाममधील चिरांग जिल्ह्यात एका स्थानिक न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी असलेल्या शिक्षकाला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने आरोपी शिक्षकाला १० हजार रूपयांचा दंड देखील ठोठावला आहे. विशेष न्यायाधीश (POSCO) बिजनी यांनी गुरूवारी चिरांग जिल्ह्यातील ट्यूशन घेणारा शिक्षक संजीब कुमार याला सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. (Teacher sentenced to 6 years in prison for sexual harassment).
अधिक वाचा : वेगवान ट्रेनमधून कामगाराने चोरला फोन, प्रवाशाला बसला धक्का
दरम्यान, गेल्या वर्षी घडलेल्या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी बिजनी पोलिस ठाण्यात आयपीसी आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. वकील प्रबीन देब रॉय यांनी सांगितले की, अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तसेच विशेष न्यायाधीश (POSCO) न्यायालयाने बिजनी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाचा आज अंतिम निकाल दिला असून आरोपीला सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
वकीलांनी कोर्टामध्ये म्हटले की, न्यायालयाने आरोपी शिक्षक संजीब कुमार याला सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे आणि कायद्याअंतर्गत दहा हजार रूपयांचा दंडही ठोठावला आहे. लक्षणीय बाब म्हणजे या दंडाचे पैसे न भरल्यास पोक्सो कायद्याच्या कलम १० अंतर्गंत सहा महिन्यांच्या अतिरिक्त कालावधीसाठी दंड भरावा लागेल. तसेच कारावासाचीही शिक्षा भोगावी लागेल.