तेजस एक्सप्रेस आजपासून धावणार नाही, 'यामुळे' ट्रेन झाली बंद

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 23, 2020 | 15:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

प्रवासी न मिळाल्याने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने २३ नोव्हेंबरपासून तेजस एक्सप्रेसचे परिचालन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tejas Express
तेजस एक्सप्रेस आता रुळावर धावणार नाही, प्रवासी न मिळाल्याने आजपासून ट्रेन झाली बंद  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • देशातील पहिली खासगी रेल्वे तेजस एक्सप्रेसचे परिचालन रद्द करण्याचा निर्णय
  • प्रवाशांच्या अभावामुळे रेल्वेने घेतला ट्रेन रद्द करण्याचा निर्णय
  • आयआरसीटीसी तेजसचे सर्व स्थानकांदरम्यानचे परिचालन थांबणार

लखनऊ: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयअरसीटीसी) (Indian Railway Catering and Tourism Corporation Limited) सोमवारी देशातील पहिली खासगी रेल्वे (India’s first private railway) तेजस एक्सप्रेसचे (Tejas Express) परिचालन रद्द (operations seized) केले. २३ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून या रेल्वेचे परिचालन रद्द करण्यात आले आहे. आयआरसीटीसीने (IRCTC) प्रवाशांच्या अभावामुळे (lack of passengers) लखनऊ-दिल्ली (Lucknow-Delhi) आणि मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmadabad) या मार्गावरील तेजस एक्सप्रेसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑक्टोबर महिन्यात पुन्हा चालू झाली होती तेजस एक्सप्रेस

कोरोना विषाणूच्या संकटामुळे स्थगितीनंतर तेजस एक्सप्रेसने ऑक्टोबरमध्ये परिचालन पुन्हा सुरू केले होते. आयआरसीटीसीने लखनऊ-दिल्ली (८२५०१/८०५०२) तेजस एक्सप्रेस आणि अहमदाबाद-मुंबई मार्गावरील (८२९०१/८२९०२) तेजस एक्सप्रेस २३ नोव्हेंबरपासून रद्द केली आहे.

प्रवाशांच्या अभावामुळे घेतला निर्णय

आयआरसीटीसीने एका वक्तव्यात म्हटले आहे की कोव्हिड-19च्या संकटाच्या परिणामस्वरूप प्रवाशांच्या अभावामुळे आयआरसीटीसीने तेजस एक्सप्रेसच्या सर्व फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या दोन मार्गांवरील भारतीय रेल्वेच्या इतर रेल्वेंमधील वर्दळ पाहता या निर्णयाची समीक्षा करेल. लखनऊ-दिल्ली (८२५०१/८०५०२) तेजस एक्सप्रेस आणि अहमदाबाद-मुंबई मार्गावरील (८२९०१/८२९०२) तेजस एक्सप्रेस १९ जानेवारी २०२० रोजी चालू करण्यात आली होती.

सर्व सुविधा असूनही तेजसला प्रवाशांची पसंती नाही

सर्व सुविधा उपलब्ध असूनही रेल्वे प्रशासनाला प्रवाशांना तेजस एक्सप्रेसकडे आकर्षित करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे रेल्वे बोर्डाने आयआरसीटीसीला २३ नोव्हेंबरपासून पुढील आदेशापर्यंत तेजस एक्सप्रेस रद्द करण्याचा आदेश दिला आहे. तेजस एक्सप्रेसचे लखनऊ मार्गावरील संचालन ४ ऑक्टोबर २०१९ रोजी चालू झाले होते. रविवारी तेजस एक्सप्रेस शेवटची सकाळी ६:३० वाजता २०० प्रवाशांसह लखनऊवरून दिल्लीला रवाना झाली होती. मार्चमधल्या लॉकडाऊननंतर तेजस एक्सप्रेसचे संचालन १७ ऑक्टोबर रोजी चालू झाले होते. १० दिवसांचे आगाऊ आरक्षण वाढवून एक महिना करण्यात आले होते. इतकेच नाही तर दिवाळीच्या दिवसांतही या ट्रेनला प्रवासी मिळाले नाहीत ज्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी ही ट्रेन रद्द करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी