वडिलांनी रागवलं म्हणून १७ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, JEE परीक्षेत झाला होता नापास

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 30, 2019 | 20:30 IST | टाइम्स नाऊ हिंदी

तेलंगणा इथल्या एका १७ वर्षीय तरुणानं जेईई मुख्य परिक्षेत अयशस्वी झाल्यानंतर वडिलांच्या बंदुकीनं स्वत:वर गोळी चालवत आत्महत्या केली. विद्यार्थी जेईई सोबतच तेलंगणा १२ वीच्या परीक्षेतही नापास झाला होता.

Student Suicide
विद्यार्थ्याची आत्महत्या  |  फोटो सौजन्य: Thinkstock

नवी दिल्ली: जेईई २०१९च्या मुख्य परीक्षेत अयशस्वी झाल्यामुळे तेलंगणातील एका १७ वर्षीय तरुणानं आत्महत्या केली. पीटीआयच्या वृत्तानुसार हा विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाला नाही त्यामुळं निराश झाला होता. त्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडून घेतली. तेलंगाणा इथं सोमवारी जेईई मुख्य २०१९ परीक्षेचा रिझल्ट जाहीर केला होता. या परीक्षेत जवळपास १२ लाख उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं होतं. 

रिपोर्टनुसार मृत तरुणाचं नाव सोहेल आहे. तो जेईई मुख्य परीक्षेसोबतच तेलंगाणा स्टेट इंटरमीडिएटच्या परीक्षेतही नापास झाला होता. सोहेलनं आपल्या वडिलांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेतली. सोहेलचे वडील लष्करातील निवृत्त जवान आहेत.

सोहेलनं इंजिनीअरिंग कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी आकाश कोचिंग इंस्टिट्यूटमध्ये क्लासेस लावले होते. मात्र परीक्षेत यश न मिळाल्यानं तो खूप निराश झाला. त्यानंतर सोहेलच्या वडिलांनी परीक्षेत नापास झाला म्हणून त्याला रागावलं. त्यामुळं आधिच निराश झालेल्या सोहेलनं वडिलांचं रागावणं ऐकून स्वत:वर गोळी झाडून घेतली. 

सोहेलचे वडील एका बँकेत सुरक्षा गार्ड म्हणून नोकरी करतात. पोलीस सोहेलचे वडील मेहरुद्दीन यांची चौकशी करत आहेत. तेलंगणात मागील एका आठवड्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरणं पुढे आले आहेत. ज्यात तेलंगणा इंटरमीडिएट परीक्षेमध्ये अयशस्वी झाल्यानंतर १९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. 

काय घडतंय १२वीचा निकाल लागल्यानंतर तेलंगणात

हैदराबादमध्ये इंटर मीडिएटच्या निकालानंतर आतापर्यंत १९ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांनंतर २६ एप्रिलला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला नोटीस पाठवला. नोटीसमध्ये विचारलं गेलं की, विद्यार्थ्यांच्या कॉपी चेकिंगचं काम हैदराबादच्या प्रायव्हेट कंपनी ग्लोबल रेना टेक्नॉलॉजीला दिलं गेलं होतं. यापूर्वी हे काम सरकारी कंपनीला दिलं जात होतं. आयोगानं राज्याचे मुख्य सचिव एस के जोशी यांना चार आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलं आहे. 

१२ वीच्या परीक्षेत नापास झालेल्या एका विद्यार्थ्याला तेलुगू शब्दात शून्य मार्क देण्यात आलं होतं. यामुळे विद्यार्थ्याने आपला पेपर रिचेकिंगसाठी दिला होता. ज्या पेपरमध्ये विद्यार्थ्याला शून्य मार्क देण्यात आले होते त्याच पेपरमध्ये त्या विद्यार्थ्याला ९९ मार्क्स मिळाले. या विद्यार्थ्याप्रमाणेच इतर विद्यार्थ्यांसोबतही असंच झालं असल्याचं बोललं जात आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी