Fire News: हॉटेलला आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी खिडकीतून मारल्या उड्या, 8 जणांचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Sep 13, 2022 | 08:30 IST

Telangana Fire: तेलंगणातील (Telangana) ग्रेटर हैदराबादमधील (Greater Hyderabad) सिकंदराबाद येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

Telangana Fire
जीव वाचवण्यासाठी मारल्या खिडकीतून उड्या, 8 जणांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • तेलंगणातील (Telangana) ग्रेटर हैदराबादमधील (Greater Hyderabad) सिकंदराबाद येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी रात्री उशिरा भीषण आग लागली.
  • या स्फोटामुळे आग लागली आणि काही क्षणात ही आग संपूर्ण इमारतीत पसरली.
  • अपघातातील मृतांचा आकडाही वाढण्याची भीती डीसीपींनी व्यक्त केली आहे.

हैदराबाद:  Eight killed in fire at Secunderabad hotel in Telangana: तेलंगणातील (Telangana)  ग्रेटर हैदराबादमधील (Greater Hyderabad)  सिकंदराबाद येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 10 जण जखमी झाले आहेत. रुबी हॉटेलच्या (Ruby Electric Vehicle)  इमारतीच्या बेसमेंटमध्ये   (Ruby Hotel building) रुबी इलेक्ट्रिक व्हेईकलच्या शोरूममध्ये बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटामुळे आग लागली आणि काही क्षणात ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर अपघातातील मृतांचा आकडाही वाढण्याची भीती डीसीपींनी व्यक्त केली आहे. सिकंदराबाद रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला.

हॉटेलमध्ये आग लागली तेव्हा जवळपास 23-25 ​​पर्यटक तिथे उपस्थित होते. धुरामुळे एका महिलेसह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. हॉटेलला लागलेली भीषण आग पाहून काही लोकांनी खिडकीतून खाली उडी मारण्याचाही प्रयत्न केला. यादरम्यान अनेक जण जखमीही झाले. स्थानिक लोकही घटनास्थळी पोहोचले आणि अनेकांना सुखरूप बाहेर काढले.
 

अधिक वाचा- चंद्र देव आज सकाळी बदलेल राशी, जाणून घ्या कोणत्या राशींचे भाग्य उघडेल

हॉटेलमध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 

स्थानिक नागरिक धावले बचावासाठी 

हैदराबाद पोलीस आयुक्तांनी या अपघातात एका महिलेसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.  इतर अनेक जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी अनेकांना सुखरूप बाहेर काढले आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

मृतांचा आकडा वाढू शकतो. हे सर्व लोक बाहेरील कामानिमित्त हैदराबादला आले होते. आग एवढी भीषण आहे की त्याच्या धुराचे लोट दूरवर पसरले असल्याची माहिती देण्यात आली आहे. हॉटेलमध्ये अनेक लोक अडकल्यामुळे स्थानिक लोकही तातडीने धावून आले आणि त्यांनी अनेकांना हॉटेलमधून सुखरूप बाहेर काढले.

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला आग लागल्याचा संशय

आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे सर्व वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या आगीच्या कारणाचा तपास करत आहेत. त्याचवेळी हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही रमण म्हणाले की, 'ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही सिकंदराबाद परिसरातील पासपोर्ट कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये एक इमारत पाहिली, ज्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचे रिचार्जिंग युनिट आहे. जे माझ्या मते धोकादायक आणि बेकायदेशीर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी