शिवरायांच्या पुतळ्याच्या कथित विटंबनेने कोल्हापूर आणि बेळगावमध्ये तणाव, कर्नाटक पोलिसांकडून 27 जणांना अटक

बेंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कथितपणे शाई ओतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी शुक्रवारी संध्याकाळी उशिरा आंदोलन केले. यानंतर आता कर्नाटकचे स्वातंत्र्यसेनानी आणि योद्धा सांगोली रायण्णा यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

 Tensions in Kolhapur and Belgaum over alleged desecration of Shivratri statue, 27 arrested by Karnataka police
शिवरायांच्या पुतळ्याच्या कथित विटंबनेने कोल्हापूर आणि बेळगावमध्ये तणाव, कर्नाटक पोलिसांकडून 27 जणांना अटक ।  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • बेंगळुरूच्या सदाशिव नगर येथील सांकिकेरे भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तोंडाला काळी शाई लावली
  • बेळगावमध्ये कर्नाटक सरकार आणि पोलिसांच्या सुमारे २६ वाहनांची तोडफोड करण्यात आली.
  • बेळगाव पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज केला

बेंगळुरू : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कथित विटंबना केल्याच्या कथित व्हिडिओचा निषेध करण्यासाठी बेंगळुरू येथे जमलेल्या लोकांच्या गटाने शुक्रवारी सायंकाळी उशिरा निदर्शने केली आणि या घटनेत सहभागी असलेल्या दोषींवर कारवाईची मागणी केली. त्याचवेळी कर्नाटकचे स्वातंत्र्यसैनिक सांगोली रायण्णा यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 27 जणांना अटक केली आहे. (Tensions in Kolhapur and Belgaum over alleged desecration of Shivratri statue, 27 arrested by Karnataka police)

बेंगळुरू येथील एका व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तोंडाला काळी शाई लावल्याचा व्हिडीओ समोर आल्याने कोल्हापूर आणि बेळगावमध्ये तणाव निर्माण झाला आहे. बेंगळुरूच्या सदाशिव नगर येथील सांकिकेरे भागात गुरुवारी ही घटना घडली.बेळगावी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात शेकडो हिंदू संघटना कार्यकर्त्यांनी आणि मराठी भाषिकांनी बेंगळुरूमध्ये निदर्शने केली.त्यांनी एकत्र येऊन रास्ता रोको केला.

हुतात्मा चौकात पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली तर बेळगावी शहरातील रामदेव गली येथे ऑटोचालकाला मारहाण करण्यात आली.दरम्यान कर्नाटक विधानसभा अधिवेशनासाठी कर्तव्यावर असलेल्या सरकारी वाहनांवर आणि पोलिसांवर काही हल्लेखोरांनी दगडफेक केली. यासोबत लॉजसमोर उभ्या असलेल्या कर्नाटक सरकारच्या काही गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. बदमाशांनी जाणूनबुजून कर्नाटक सरकारच्या वाहनांवर दगडफेक केली आणि काही वाहनांचे फलकही काढले. प्राथमिक माहितीनुसार, सहा सरकारी गाड्यांचे नुकसान झाले आहे.

तणाव वाढल्याने बेळगाव पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज केला. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या टोळीवर लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या तोंडाला काळी शाई लावल्याप्रकरणी बेंगळुरूमधील सदाशिवनगर पोलिस ठाण्यातही बदमाशांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बेंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त कमल पंत म्हणतात, सदाशिव नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, आम्ही याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करू. सांगोली रायण्णा, कर्नाटक स्वातंत्र्यसेनानी आणि योद्धा सांगोली रायण्णा यांच्या पुतळ्याची तोडफोड प्रकरण समोर आले आहे. समोर दरम्यान, परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.
तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २७ जणांना अटक बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त डॉ के त्यागराजन यांच्या म्हणण्यानुसार, सांगोली रायण्णा यांच्या पुतळ्याची काही लोकांनी तोडफोड केल्यानंतर बेळगावमधील तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ जणांना अटक करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी