Rajasthan Accident: बाडमेर-जोधपूर महामार्गावर बस-टँकरचा भीषण अपघात; वाहनांच्या जोरदार धडकेत बसने घेतला पेट, 12 जणाचा जळून मृत्यू

Rajasthan's Barmer-Jodhpur highway road accident: राजस्थानमध्ये बस आणि टँकरचा (Bus-Tanker) भीषण अपघात (Accident) झाला आहे. बाड़मेर-जोधपूर महामार्गावर (Barmer-Jodhpur Highway) चुकीच्या बाजुने येणाऱ्या टँकरने  बसला जोरदार धडक झाली.

 Terrible bus-tanker accident on Barmer-Jodhpur highway; 12 killed in bus crash
बस-टँकरचा भीषण अपघात, 12 जणाचा जळून मृत्यू   |  फोटो सौजन्य: Twitter

Rajasthan's Barmer-Jodhpur highway road accident: राजस्थानमध्ये बस आणि टँकरचा (Bus-Tanker) भीषण अपघात (Accident) झाला आहे. बाड़मेर-जोधपूर महामार्गावर (Barmer-Jodhpur Highway) चुकीच्या बाजुने येणाऱ्या टँकरने  बसला जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, धडक होताच बसने पेट घेतला. यामुळे 12 जणांचा जळून मृत्यू झाला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार चुकीच्या दिशेने येत असलेल्या टँकरने प्रवाशांनी भरलेल्या बसला जोराची धडक दिली. यानंतर बसने पेट घेतला. काही क्षणार्धात ही घटना घडल्याने जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्याचा वेळ देखील मिळाला नाही. पोलिसांनी 12 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. परंतु अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच पचपदरा पोलीस आणि अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याात आलं. रेस्क्यू ऑपरेशन करत मृतदेहांना बसमधून काढण्यात आले. 

या भीषण अपघातात बसमधील सुमारे 22-23 प्रवासी भाजल्याचे वृत्त आहे, त्यांना बालोत्रा ​​येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत, तर मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी