Al Qaeda: ‘अशा धमक्या खूप येतात’; अल-जवाहिरीच्या धमकीला भारताचे उत्तर

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 12, 2019 | 08:43 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Al Qaeda: अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीने व्हिडिओ प्रसारित करून, भारतीय सेना आणि सरकारवर सातत्याने हल्ले करा आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान करा, असे दहशतवाद्यांना सांगितले आहे. त्याला भारताने उत्तर दिले आहे.

terrorist al zawahiri al qaeda
अल-जवाहिरीच्या धमकीला भारताचे उत्तर   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना अल-जवाहिरीचा संदेश
  • भारत सरकारवर, सैन्यावर हल्ला करण्याच्या दिल्या सूचना
  • भारताचे अल-जवाहिरीच्या धमकीला प्रत्युत्तर

नवी दिल्ली : अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अयमान अल-जवाहिरीने भारताला दिलेल्या धमकीला परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी अशा धमक्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अल-जवाहिरीने नुकताच एक व्हिडिओ प्रसारित केला असून, भारतीय सेना आणि सरकारवर सातत्याने हल्ले करून त्यांच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान करण्याचे दहशतवाद्यांना सांगितले आहे. जवाहिरीच्या या व्हिडिओ संदर्भात रवीश कुमार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले होते. त्यावर रवीश कुमार म्हणाले, ‘अशा धमक्या आम्ही कायम ऐकत असतो. मला वाटत नाही की, याला खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आमचे सुरक्षा दल पूर्णपणे तयार आहे. आमची अखंडता कायम ठेवण्यास आम्ही सक्षम आहोत.’ रवीश कुमार यांनी करतारपूर कॉरिडोर संदर्भातही उत्तर दिले आहे ते म्हणाले, ‘आम्ही या पूर्वीही हा मुद्दा पाकिस्तानसमोर उपस्थित केला आहे. यात केवळ पायाभूत सुविधाच नाही तर, एका पुलाचाही समावेश आहे. पण, एक पूल व्हायला पाहिजे की, पक्का रस्ता यावर चर्चा सुरू आहे, असे मला वाटते.

काय म्हणाला होता जवाहिरी?

दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीने भारताला धमकी देणारा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यात त्यांना काश्मीरमधील दहशतवाद्यांना भारतीय सैन्यावर आणि सरकारवर सातत्याने हल्ले करण्याचा सल्ला दिला होता.

 

 

कोण आहे जवाहिरी?

अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल-जवाहिरीनेच अल-कायदाची धुरा सांभाळली आहे. सध्या तो अज्ञात स्थळावरून सुत्रे हालवत आहे. त्याने काश्मीरमधील सशस्त्र दहशतवाद्यांना सांगितले की, तुम्ही तुमचे सगळे लक्ष भारतीय सैन्य आणि सरकारवर हल्ला करण्यावर ठेवा. जेणेकरून त्यांच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होईल आणि भारताच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल. जवाहिरी हा मुळचा इजिप्तचा रहिवासी आहे. अमेरिकेने त्यांच्या ठिकाण्याची माहिती देणाऱ्याला अडीच कोटी डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे.

काश्मिरी तरुणांवर परिणाम नाही

भारतीय सेनेने जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य भरती सुरू केली आहे. बारामुल्ला जिल्ह्यात सुरू असलेल्या भरतीमध्ये पाच हजारहून अधिक तरूण सहभागी झाले होते. १० जुलै ते १६ जुलै असा हा भरतीचा कार्यक्रम चालणार आहे. यात बांदीपोरा, कुपवाड़ा, गांदरबल, बारामूल्ला, श्रीनगर, बडगाम, पुलवामा, शोपियां, अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्यात मोठ्या संख्येने तरूण भारतीय लष्करात सामील होण्यासाठी येत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Al Qaeda: ‘अशा धमक्या खूप येतात’; अल-जवाहिरीच्या धमकीला भारताचे उत्तर Description: Al Qaeda: अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीने व्हिडिओ प्रसारित करून, भारतीय सेना आणि सरकारवर सातत्याने हल्ले करा आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान करा, असे दहशतवाद्यांना सांगितले आहे. त्याला भारताने उत्तर दिले आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles