Terrorist Attack : जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद, १४ पोलीस जखमी

जम्मू कश्मीरमध्ये आज सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात  २ जवान शहीद झाले असून त्यात १४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. श्रीनगरच्या जेवन भागात हा हल्ला झाला आहे. Terrorist Attack In Jewan On Outskirts Of Srinagar, 14 Police Personnel Injured, Three In Critical Condition

terrorist attack
दहशतवादी हल्ला 
थोडं पण कामाचं
  • जम्मू कश्मीरमध्ये आज सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हला
  • २ जवान शहीद
  • १४ पोलीस कर्मचारी जखमी

Terrorist Attack : श्रीनगर : जम्मू कश्मीरमध्ये आज सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात  २ जवान शहीद झाले असून त्यात १४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. श्रीनगरच्या जेवन भागात हा हल्ला झाला आहे. या घटनेची माहिती मिळता सुरक्षा दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या भागात नाकाबंदी केली आहे. तसेच दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.  

Terrorist Attack In Jewan On Outskirts Of Srinagar, 14 Police Personnel Injured, Three In Critical Condition

श्रीनगरच्या जेवन भागात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या वेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. या हल्ल्यात १४ पोलीस जखमी झाले असून दोन पोलीस शहीद झाले आहेत. शहीद झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांमध्ये एक उपनिरीक्षक आणि एक सेलेक्शन ग्रेड अधिकार्‍याचा समावेश आहे. सर्व जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान कश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जवाबदारी घेतली आहे.   

चकमकीत दोन दहशतवाद्यांचा झाला होता खात्मा

सोमवारी सकाळी जम्मू कश्मीरच्या श्रीनगरमधील रंगरेथ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. त्यात सुरक्षा दलाला दोन दशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते. मृत दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रासाठा आढळला होता. चकमकीनंतर सुरक्षा दलाने या भागात शोधमोहीम हाती घेऊन या भागात नाकाबंदी केली होती. तेव्हाच दशतवादी हल्ल्याचे वृत आले.  

IRP चे जवान जखमी

श्रीनगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. एका अधिकर्‍याने दिलेल्या माहितीनुसार पंथा चौक-खोनमोह मार्गावर ९ वी बटालियन इंडियन रिझर्व्ह पोलिसांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात १४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यापैकी चारजणांची प्रकृती गंभीर आहे. तर दोन जवान शहीद झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी