सोमालिया : राजधानी मोगादिशूमधील हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला

terrorist attack in Somalia capital Mogadishu, Hotel Hyatt targeted : सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील हॉटेल हयातमध्ये (Hotel Hayat) दहशतवादी हल्ला झाला. अल शबाब (al-Shabab militants) या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला.

terrorist attack in Somalia capital Mogadishu, Hotel Hyatt targeted
सोमालिया : राजधानी मोगादिशूमधील हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सोमालिया : राजधानी मोगादिशूमधील हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला
  • अल शबाब (al-Shabab militants) या दहशतवादी संघटनेने हल्ला केला
  • सुरक्षा पथकाने सर्व हल्लेखोरांना ठार केले

terrorist attack in Somalia capital Mogadishu, Hotel Hyatt targeted : सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील हॉटेल हयातमध्ये (Hotel Hayat) दहशतवादी हल्ला झाला. अल शबाब (al-Shabab militants) या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला. तब्बल १४ तासांनी सुरक्षा पथकाने सर्व हल्लेखोरांना ठार केले. एकूण किती दहशतवादी ठार झाले हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

हॉटेल हयात येथे एकूण पंधरा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांनी दोन कारबॉम्बचे स्फोट केले आणि वेगाने हॉटेलमध्ये प्रवेश केला. यामुळे हॉटेलमध्ये आग लागली. आग लागल्यामुळे हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. 

दहशतवादी हल्ला होताच सुरक्षा पथकाने संपूर्ण हॉटेलला घेराव घातला. दहशतवादी हॉटेलच्या विशिष्ट भागात असल्याचे पाहून उर्वरित भागातून हॉटेलमधील नागरिकांना आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यास सुरुवात झाली. बहुसंख्य नागरिकांना सुरक्षितरित्या हॉटेलबाहेर काढण्यात आले आहे. पण काही नागरिकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले. ठार झालेल्या नागरिकांमध्ये हॉटेलचे मालक अब्दिरहमान इमान तसेच एक मौलवी यांचा समावेश आहे. व्यावसायिकांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला.

दहशतवाद्यांनी दोन कारबॉम्बचे स्फोट करून हॉटेलमध्ये घुसखोरी केली. यापैकी एक हॉटेलच्या गेटजवळ आणि दुसरा हॉटेल परिसरातील बॅरिकेडजवळ फुटला. सुरक्षा पथकांनी हॉटेलला घेरल्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा पथके यांच्यात थांबून थांबून १४ तास गोळीबार सुरू होता.

मे महिन्यात सोमालियाच्या नव्या प्रेसिडेंटची निवड झाली. यानंतर शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी अल शबाब संघटनेने देशात पहिला मोठा दहशतवादी हल्ला केला. हा हल्ला हॉटेल हयात येथे झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी