Afghanistan Taliban : तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानला फटका, दहशतवादी हल्ल्यात कमालीची वाढ

terrorist attack increased in Pakistan after Taliban takeover Afghanistan २०२१ मध्ये तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्यामुळे शेजारील राष्ट्र पाकिस्तानला याचा फटका बसला आहे. तालिबान्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जिवीतहानी झाली आहे.

pakistan terrorist attack
दहशतवादी हल्ला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • २०२१ मध्ये तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला.
  • त्यामुळे शेजारील राष्ट्र पाकिस्तानला याचा फटका बसला आहे.
  • पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाली आहे.

Afghanistan Taliban : इस्लामाबाद : २०२१ मध्ये तालिबान्यांनी (taliban) अफगाणिस्तानवर (afghanistan) ताबा मिळवला. त्यामुळे शेजारील राष्ट्र पाकिस्तानला (pakisan) याचा फटका बसला आहे. तालिबान्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांत (Terrorist Attack) वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जिवीतहानी झाली आहे. (terrorist attack increased in Pakistan after Taliban takeover Afghanistan )

पाकिस्तान इन्स्टिट्युट कॉन्फ्लिक्ट अँड सीक्युरिटी स्टडी (PICSS) या संस्थेने एक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतावी हल्ले वाढले आहेत. पाकिस्तानमधील बलुचिस्तानला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. २०२१ च्या ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानमध्ये ४५ दहशतवादी हल्ले झाले आहेत. 

बलुचिस्तान प्रांताला सर्वाधिक फटका

१० नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली होती. त्यानंतरही हे हल्ले होतच होत. 
या दहशतवादी हल्ल्यांचा सर्वाधिक फटका बलुचिस्तान प्रांताला बसला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये १०३ दहशतवादी हल्ले झाले आहेत, त्यात १७० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण जखमींपैकी ५० टक्के जखमी बलुचिस्तानमधील आहेत. 

बलुचिस्तानानंतर खैबर पख्तुन्वा प्रांताला याचा सर्वाधिक फटका बस्ला आहे. तर सिंध प्रांतात १५ दहशतवादी हल्ले झाले असून २३ नागरिकांचा मृत्यू तर २९ नागरिक जखमी झाले आहेत. तर पंजाब प्रांतात १० दहशतवादी हल्ले झाले आहेत. पंजाब प्रांतात दहशतवादी हल्ल्यांमुळे १० नागरिकांचा मृत्यू झाला असून ८७ जण जखमी झाले आहेत.   

भारताच्या स्वांतत्र्यदिनी अफगाणिस्तानात तालिबान

भारत १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतला. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये एकच गोंधळ उडाला होता. विमानतळावर अनेक देशांच्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती. भारताने वंदे भारत मिशन राबवून आपल्या हजारो नागरिकांना मायदेशी परत आणले. फक्त भारताच्या नाहीच तर अनेक अफगाणिस्तानमधील निर्वासितांना भारताने आश्रय दिला. यावेळी काबुल विमानतळावर चेंगराचेंगरी झाली होती आणि अनेक नागरिकांचा मृत्यूही झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी