श्रीनगर: जम्मूतील (Jammu) चड्ढा कॅम्पजवळ (Chadha Camp) शुक्रवारी पहाटे ४ वाजता दहशतवाद्यांनी सीआयएसएफच्या (CISF) बसवर (bus) हल्ला केला. दहशतवाद्यांनी (Terrorist) बसवर ग्रेनेड (grenade) फेकले या बसमध्ये १५ जवान होते. सीआयएसएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्यानंतर घटनास्थळी चकमक झाली, त्यानंतर चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी पळवून गेले. या चकमकीत एएसआय शहीद झाल्याचे वृत्त आहे, तर १० जवान जखमी झाले आहेत. रात्रीपासून चकमक सुरू असलेल्या सुंजवानमध्ये सुरू असलेल्या चकमकीत जवान लष्कराला मदत करण्यासाठी जात होते. त्यात एक जवान शहीद झाल्याचीही बातमी आहे. दुसरीकडे, बारामुल्लामध्ये लष्कराने 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
जम्मू-काश्मीरमधील सुंजवान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक सुरक्षा दल शहीद झाल्याची माहिती आहे, तर 4 जवान जखमी झाले आहेत. जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी माहिती दिली की, चकमकीत सुरक्षा दलाचा 1 जवान शहीद झाला असून 4 जवान जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री आम्ही परिसराची नाकेबंदी केली होती. दरम्यान, अजूनही चकमक सुरू असून दहशतवादी घरात लपून बसले आहेत.
गुरुवारी पहाटे बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर युसूफ कंत्रूसह चार दहशतवादी ठार झाले. अधिका-यांनी सांगितले की, खोऱ्यातील सर्वात जास्त काळ जिवंत राहिलेला दहशतवादी कंत्रू, अनेक सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि नागरिकांच्या हत्येत सामील आहे आणि काश्मीर खोऱ्यातील टॉप 10 वॉन्टेड दहशतवाद्यांमध्ये त्याचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांनी सांबा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी या भागातील दहशतवादी कारवाया तीव्र झाल्या आहेत. सुंजवानमध्ये ज्या ठिकाणी चकमक होत आहे तिथून सांबाचे अंतर फारसे नाही.