Terrorist Attack: दहशतवाद्यांच्या टार्गेटवर परत एकदा पंडित; शोपियामध्ये दोन काश्मिरी पंडितांवर गोळीबार

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांचे (terrorists) काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandits) होणाऱ्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. दहशतवाद्यांनी (terrorists) पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandits ) लक्ष्य केले (Terrorist Attack On ) आहे. दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडितांवर गोळीबार केला असून यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.

Two Kashmiri Pandits shot dead in Shopia
शोपियामध्ये दोन काश्मिरी पंडितांवर गोळीबार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सुनील कुमार आणि पिंटू कुमार या दोन भावांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
  • हल्ल्याच्या वेळी हे दोघेजण सफरचंदाच्या बागेत होते.

Terrorist Attack on Kashmiri Pandits : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांचे (terrorists) काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandits) होणाऱ्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. दहशतवाद्यांनी (terrorists) पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandits ) लक्ष्य केले (Terrorist Attack On ) आहे. दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडितांवर गोळीबार केला असून यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. हे दोघेही भाऊ असल्याची माहिती आहे. शोपिया जिल्ह्यातील चोटीगाम गावात ही घटना घडली. 

सुनील कुमार आणि पिंटू कुमार या दोन भावांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. हल्ल्याच्या वेळी हे दोघेजण सफरचंदाच्या बागेत होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.  जम्मू-काश्मीरचे आयजीपी यांनी म्हटले की,  महिला, बालके, निशस्त्र पोलीस कर्मचारी आणि स्थलांतरीत मजूरांसह निर्दोष नागरिकांना लक्ष्य करून  दहशतवादी काश्मीर खोऱ्यात शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खीळ बसवू शकत नाही. काश्मीरमधील सर्व भागात दहशतवाद्यांविरोधात, विशेषत: दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरूच राहणार आहे. काही दिवसांपूर्वी बांदिपोरामध्ये दहशतवाद्यांनी एका मजूरांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

Read Also : गजकर्णामुळे चारचौघात बसणं-उठणं अवघड झालंय का? मग हे उपाय करा

 काही दिवसांपूर्वीच बडगाम जिल्ह्यात वाटरहेल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दहशतवादी लतीफ राथरचा खात्मा करण्यात यश मिळाले होते. दहशतवादी लतीफ हा काश्मीर खोऱ्यातील 'टार्गेट किलिंग'मध्ये सहभागी होता. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, दहशतवादी लतीफ राथरने काही निर्दोष नागरिकांची हत्या केली होती. राहुल भट आणि आमरीन भट यांच्या हत्येतदेखील त्याचा सहभाग होता. 

गृहमंत्री अमित शाहाकडून औवेसींनी मागितलं उत्तर 

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ओवैसी यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये भाजपने नियुक्त केलेले नायब उपराज्यपाल आहेत. पंतप्रधान मोदी यांचे प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. जम्मू-काश्मीरसाठी विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद 370 रद्द केल्याने काश्मिरी पंडितांना फायदा होईल, असे सांगितले जात होते. मात्र, काश्मिरी पंडित असुरक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचे हे अपयश असून गृहमंत्री अमित शाह यांनी यावर उत्तर द्यायला हवं अशी मागणी त्यांनी केली. 

Read Also : Loan Appच्या माध्यमातून चीनचा भारतीय लोकांच्या पैशावर डल्ला

काँग्रेसकडून केंद्रावर हल्लाबोल 

काश्मिरी पंडितांवर गोळीबारीची घटना सतत घडत असल्यानं काँग्रेसने केंद्रावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगवर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. काश्मीरमधील आणखी एका पंडिताच्या हत्येबाबत पत्रकार परिषदेत पवन खेरा म्हणाले की, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यांचे काश्मीरविषयीचे धोरण का अपयशी ठरले, जनतेला सांगावे. पत्रकार परिषेदत श्वतेपत्रिका काढून त्याची कारणे सांगण्याची वेळ असल्याचं खेडा म्हणालेत. खेडा म्हणाले की, काश्मीरच्या लोकांनी त्यांच्या घरावर तिरंगा ध्वज फडकवला. त्यामुळे घाबरून पाकिस्तानी दहशतवादी हे काम करत आहेत. दहशतवादी भ्याड असून पाकिस्तानला काश्मीरमध्ये रक्तरंजित खेळ खेळायचा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी