Jammu Kashmir Attack: काश्मिरी पंडितांवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; २४ तासात घडली तिसरी घटना 

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 05, 2022 | 11:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jammu Kashmir Attack । काश्मिरी पंडितांच्या पलायनाचा मुद्दा सध्या खूप चर्चेत आहे. मात्र पुन्हा एकदा काश्मिरी पंडीतांवरील हल्ल्याची घटना समोर आली आहे. काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात काश्मिरी पंडितांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीब राबवली आहे. लक्षणीय बाब म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये सोमवरी दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ सलग तीन हल्ले केले.

Terrorist attacks on Kashmiri Pandits once again The third incident happened in 24 hours
काश्मिरी पंडितांवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काश्मिरी पंडीतांवर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे.
  • २४ तासात घडली तिसरी घटना.
  • दहशतवाद्यांकडून मैसुमा भागात सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार करण्यात आला.

Jammu Kashmir Attack । नवी दिल्ली : काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandits) पलायनाचा मुद्दा सध्या खूप चर्चेत आहे. मात्र पुन्हा एकदा काश्मिरी पंडीतांवरील हल्ल्याची घटना समोर आली आहे. काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात काश्मिरी पंडितांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीब राबवली आहे. लक्षणीय बाब म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये सोमवरी दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ सलग तीन हल्ले केले. सोमवारी रात्री शोपियानमध्ये रात्री आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडीताच्या दुकान मालकावर गोळीबार करून त्यांना जखमी केले, त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. (Terrorist attacks on Kashmiri Pandits once again The third incident happened in 24 hours). 

अधिक वाचा : लोकल प्रवासासाठी लसीकरणाची नाही गरज

दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात मोठी दुर्घटना झाली आहे, चोटीगाम गावातील बाल कृष्णा यांच्या हाताला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. त्यांना श्रीनगमधील लष्करी इस्पितळात नेण्यात आले आहे. तिथे डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरी पंडीतांच्या दुकानावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांना संबंधित गावात तैनात करण्यात आले आहे. यापूर्वी श्रीनगरच्या मैसुमा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (CRPF) एक जवान शहीद झाला होता. तर एक जवान जखमी झाला होता. याबाबतीत अधिकाऱ्यांनी माहिती दिली. 

दहशतवाद्यांकडून मैसुमा भागात सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले असून जखमी झालेल्यांना SMHS रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार एक जवान शहीद झाला आहे तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी परिसराची नाकेबंदी करून युध्द पातळीवर शोध मोहीम राबवली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी