दहशतवादी हाफिझ सईदचा मुलगा तल्हा पण दहशतवाद्यांच्या यादीत

Terrorist Hafiz Saeed's son Talha also declared terrorist, Home Ministry issued notification : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोयबा'चा प्रमुख हाफिझ सईद याला भारताने आधीच दहशतवादी ठरवून मोस्ट वाँटेड यादीत ठेवले आहेत. आता हाफिझ सईदचा मुलगा तल्हा यालाही भारताने दहशतवादी जाहीर केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली.

Terrorist Hafiz Saeed's son Talha also declared terrorist, Home Ministry issued notification
दहशतवादी हाफिझ सईदचा मुलगा तल्हा पण दहशतवाद्यांच्या यादीत 
थोडं पण कामाचं
  • दहशतवादी हाफिझ सईदचा मुलगा तल्हा पण दहशतवाद्यांच्या यादीत
  • केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली
  • तल्हा हाफिझ सईद याला यूएपीए १९६७ अंतर्गत दहशतवादी जाहीर करण्यात आले

Terrorist Hafiz Saeed's son Talha also declared terrorist, Home Ministry issued notification : नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोयबा'चा प्रमुख हाफिझ सईद याला भारताने आधीच दहशतवादी ठरवून मोस्ट वाँटेड यादीत ठेवले आहेत. आता हाफिझ सईदचा मुलगा तल्हा यालाही भारताने दहशतवादी जाहीर केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली.

तल्हा हाफिझ सईद याला यूएपीए १९६७ अंतर्गत दहशतवादी जाहीर करण्यात आले. 'लष्कर-ए-तोयबा'चा एक प्रमुख दहशतवादी तसेच लेट्स के मौलवी विंगचा प्रमुख नेता असलेल तल्हा भारतविरोधी कारवायांसाठी निधी संकलन करतो. दहशतवादी कारवाया करण्यासाठी कट आखणे, नियोजन करणे, कटाची अंमलबजावणी करणे अशी बेकायदा कृत्य करतो; अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली. 

तल्हा पाकिस्तानमध्ये भारत, इस्रायल, अमेरिका तसेच इतर पाश्चात्य देशांविरोधात, लोकशाहीप्रधान देशांविरोधात प्रचार करत आहे. भारतविरोधी कारवायांसाठी निधी संकलित करण्याचे काम करत आहे. यामुळेच तल्हाला भारताच्या गृहमंत्रालयाने दहशतवादी अधिसूचीत केले आहे. 

दहशतवादी हाफिझ सईदला ३१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

पाकिस्तानमधील लाहोरच्या दहशतवाद विरोधी कोर्टाने शुक्रवार ८ एप्रिल २०२२ रोजी एक मोठा निर्णय दिला. लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा प्रमुख दहशतवादी हाफिझ सईद याला कोर्टाने दोषी ठरविले आणि ३१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. मुंबईमध्ये २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिझला दोन बेकायदा फंडांच्या माध्यमातून निधी संकलन केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या काळ्या यादीत असलेल्या दहशतवादी हाफिझ सईद याला लाहोरच्या दहशतवाद विरोधी कोर्टाने ३.४ लाख रुपयांचा दंड ठोठावला. हाफिझ सईद याच्या नावावर असलेली सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले. यात हाफिझच्या मालकीच्या मदरशांचाही समावेश आहे. न्या. एजाझ अत्तार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला.

दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या पाकिस्तानला एफएटीएफने (Financial Action Task Force - FATF / आर्थिक कृती कार्यदल / वित्तीय कारवाई कार्यदल) जून २०२२ पर्यंत 'ग्रे लिस्ट'मध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत संपण्याच्या सुमारास एफएटीएफची पुन्हा बैठक होईल. या बैठकीत पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचा आढावा घेतला जाईल. यानंतर पाकिस्तानला एफएटीएफच्या कोणत्या लिस्टमध्ये ठेवावे याचा निर्णय होणार आहे. यामुळेच पाकिस्तानने हाफिझ विरोधात कारवाई केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात पाकिस्तानकडून अधिकृतरित्या तरी हाफिझविरोधात कायदेशीर कारवाई झाली, असेच सांगितले जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी