दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Sep 16, 2019 | 19:21 IST

Headlines of the 16th September 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

top 5 news_latest news_times now marathi
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९ आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे...  दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं मुंबईसह देशातील ११ रेल्वे स्थानकांत आणि सहा राज्यातील मंदिरांत बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. एक धमकी देणारं पत्र हरियाणातील रोहतक रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांना मिळालं आहे.  दुसरी महत्त्वाची बातमी,  सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकत निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन स्वाभिमानी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आले. तिसरी आजची महत्त्वाची बातमी, फालुदा खात असताना एक धारदार ब्लेड तोंडात गेल्याची धक्कादायक घटना पुण्याजवळ असलेल्या पिंपळे सौदागर येथे घडली.  ग्राहक हा एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. चौथी महत्त्वाची बातमी, विद्यार्थीनीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकला अटक करण्यात आली आहे. पवईतील खासगी शिकवणीतील शिक्षकानं असं वाईट कृत्य केलं आहे. पाचवी महत्त्वाची बातमी, नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या सविस्तर बातम्या वाचूया फक्त एका क्लिकवर.

दसऱ्याला मुंबईसह देशभरातील ६ मंदिरात बॉम्बस्फोटाने उडवण्याची 'जैश-ए-मोहम्मद'ची धमकीः  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा प्लॅन आखला आहे. जैश-ए-मोहम्मदने एक धमकीचं पत्रही पाठवलं आहे. या पत्रात मुंबईसह देशातील १०-११ रेल्वेस्थानकांत बॉम्बस्फोट घडवण्याचं म्हटलं. बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या आणि अंडी, भीषण अपघात वाचलाः  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर-सांगली रस्त्यावरून जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या रथावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

धक्कादायक, पुण्यात फालुद्यात सापडले ब्लेडः   रस्त्यावरील फालुदा विक्रेत्याकडून फालुदा विकत घेणे एका ग्राहकाला चांगले भोवले. फालुदा खात असताना एक धारदार ब्लेड तोंडात गेल्याची धक्कादायक घटना पुण्याजवळ असलेल्या पिंपळे सौदागर येथे घडली. बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गुरू-शिष्याचा नात्याला काळीमा, विद्यार्थींनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटकः   खासगी शिकवणीत विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला गुरूवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे. सचिन गुलाब हांडे असे ४२ वर्षीय आरोपी शिक्षकाचे नाव आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

सरकारी नोकरीची संधी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात लिपिक पदासाठी भरतीः   नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी