दहशतवादी शाहनवाजच्या कुटुंबीयांनी घरावर फडकावला तिरंगा; मुलाला दिला महत्त्वाचा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अभियानाची सुरुवात केली. या अभियानातून आपण स्वातंत्र्यविरांनी कृतज्ञता व्यक्त करता येत. त्यांच्या या अभियानातून शाहनवाजच्या कुटुंबियांना देशाविषयीचं प्रेम सर्वांसमोर आता आलं. दहशतवादी शाहनवाज याच्या कुटुंबीयांनी 'आझादी का अमृतमहोत्सव' या उपक्रमांतर्गत घरावर राष्ट्रध्वज फडकावला. शाहनवाज याचे कुटुंबीय अजूनही भारतात राहतात. त्याच्या या कृतीने सारेच आश्चर्यचकित झाले आहेत. यावेळी शाहनवाजच्या वडिलांनी आपल्या मुलाला एक संदेशही दिला आहे. 

Terrorist's family's love for India, tricolor hoisted on the house
दहशतवाद्याच्या कुटुंबीयांचं भारत प्रेम,घरावर फडकावला तिरंगा (Representative Imge)  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दहशतवादी शाहनवाज याच्या कुटुंबीयांनी 'आझादी का अमृतमहोत्सव' या उपक्रमांतर्गत घरावर राष्ट्रध्वज फडकावला.
  • मुलाने दहशतवादाचा मार्ग सोडून पुन्हा भारतात यावे, अशी शाहनवाजच्या कुटुंबीयांची इच्छा आहे.
  • शाहनवाज कंठचे २२ वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्याला प्रशिक्षण देत दहशतवादी बनवले होते.

श्रीनगरः आज संपूर्ण देश 75 वा स्वातंत्र्यदिन (independence day) साजरा करत आहे. या अमृत महोत्सवी (Amrit Mahotsav) हर घर तिरंगा अभियान (Har Ghar Triranga Abhiyan) राबवला जात आहे. प्रत्येक भारतीयांसाठी हा क्षण अभिमानाचा आहे. परंतु एखाद्या घरातील व्यक्तीने देशाविरोधात काहीतरी कारस्थान केलं आणि त्याच्या कृत्यामुळे इतर कुटुंबियांना तिरस्कार सहन करावा लागतो. अशात ते कुटुंबियांना आपल्या मनात देशाविषयी असलेल्या अभिमान भावना, व्यक्त करण्यात खूप अवघड असतं. कारण त्यांना नेहमी संशयाच्या नजरेतून पाहिलं जातं. पण वर्षाच्या अमृत महोत्सवात दहशतवादी शाहनवाजच्या कुटुंबियांनी भारताविषयीचं प्रेम व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अभियानाची सुरुवात केली. या अभियानातून आपण स्वातंत्र्यविरांनी कृतज्ञता व्यक्त करता येत. त्यांच्या या अभियानातून शाहनवाजच्या कुटुंबियांना देशाविषयीचं प्रेम सर्वांसमोर आता आलं. दहशतवादी शाहनवाज याच्या कुटुंबीयांनी 'आझादी का अमृतमहोत्सव' या उपक्रमांतर्गत घरावर राष्ट्रध्वज फडकावला. शाहनवाज याचे कुटुंबीय अजूनही भारतात राहतात. त्याच्या या कृतीने सारेच आश्चर्यचकित झाले आहेत. यावेळी शाहनवाजच्या वडिलांनी आपल्या मुलाला एक संदेशही दिला आहे. 

Read Also : या 5 बॉलिवूड कलाकारांनी चित्रपटांमध्ये भरला देशभक्तीचा रंग

रविवारी शाहनवाजच्या कुटुंबीयांनी घरी राष्ट्रध्वज फडकावला. मुलाने दहशतवादाचा मार्ग सोडून पुन्हा भारतात यावे, अशी शाहनवाजच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. आमचं सगळं हिंदुस्तानात आहे. पाकिस्तानशी आमचा कोणाताही संबंध नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
शाहनवाज कंठचे २२ वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्याला प्रशिक्षण देत दहशतवादी बनवले होते. आपला मुलगा पुन्हा भारतात परतावा व त्याने दहशतवादाच्या दलदलीतून बाहेर पडावे, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आजच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने त्यांनी शाहनवाजला पुन्हा परतण्याचे आवाहन केले आहे.

Read Also : मुख्यमंत्री शिंदे मेटेंच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार

२०००मध्ये दहशतवादी शाहनवाजला घेऊन गेले होते. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता. २०१५पर्यंत कधीतरी त्यांच्याशी संपर्क होत होता. मात्र, त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यासोबत काहीच संपर्क झालेला नाही. आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी आम्ही आमच्या मुलाला परत येण्याचं अवाहन करत आहोत. असं, शाहनवाजचे वडील अब्दुल रशीद कंठ यांनी म्हटलं आहे. किश्तवाडयेथील हुलर गावात राहणारे अब्दुल रशीद कंठ आणि त्यांचा दुसरा मुलगा नवाज कंठ यांनी रविवारी नगर परिषदचे अध्यक्ष सज्जाद यांना फोन करुन तिरंगा देण्यास सांगितले. नगर परिषद अध्यक्ष सज्जाद हे यांनी तिरंगा दिल्यानंतर कुटुंबीयांसोबत घरावर मोठ्या दिमाखात ध्वजारोहण केले.

दरम्यान, जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी १९वर्षीय तरुणाला अटक रविवारी अटक केली. हा तरुण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील हँडलर्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हबीबुल इस्लाम उर्फ सैफुल्ला असे या तरुणाचे नाव आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी