फाशीच्या ४५ मिनिटं आधीची कहाणी, पाहा दोषींची काय झाली होती अवस्था 

Nirbhaya convicts hanged: निर्भयाच्या दोषींसाठी २० मार्च हा शेवटचा दिवस ठरला. यावेळी तिहार तुरूंगाच्या कोठडी फाशीपूर्वी तब्बल ४५ मिनिटांपूर्वी काय घडलं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

that story of 45 minutes before the hanging someone cried and made a fuss but the result was sure
फाशीच्या ४५मिनिटं आधीची कहाणी, दोषींची काय झाली होती अवस्था  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: निर्भयाच्या दोषींना आज (२० मार्च) फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. आता ते या जगात नाहीत. तिहार जेलमध्ये पहाटे साडेपाच वाजता पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय सिंह आणि मुकेश सिंह यांना फाशी देण्यात आली. पण फाशीच्या जवळजवळ ४५ मिनिटांपूर्वी नेमकं काय घडले ते आम्ही आपणाला सांगणार आहोत. काल (१९ मार्च) रात्री दिल्ली उच्च न्यायालयात कार्यवाही सुरू असताना तिहारमधील दोषींची घालमेल आणखी वाढत होती. ते वारंवार तुरूंग अधिकाऱ्यांना वारंवार विचारत होते की काही आदेश आले आहेत का? पण अधिकाऱ्यांकडून उत्तर न मिळाल्याने दोषी निशब्द झाले होते. 

फाशीच्या ४५ मिनिटं आधी काय घडलं?

पहाटे पाच वाजेच्या सुमारास तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांनी पवन, अक्षय, विनय आणि मुकेश यांच्या सेलमध्ये प्रवेश केला. विनय हा त्यांच्यापैकी असा व्यक्ती होता जो अतिशय वाईट पद्धतीने रडत होता. पण इतरांच्या चेहऱ्यावर तणावपूर्ण शांतता होती. चारही आरोपींना रात्रभर झोप येत नव्हती. चौघांनाही त्यांचा  मृत्यू जवळ येत असल्याचं दिसत होतं. त्यानंतर, त्यांची शेवटची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी पूर्ण झाल्यानंतर चौघांनाही तुरूंगातील क्रमांक तीनच्या आत बनविण्यात आलेल्या फाशीच्या कोठीमध्ये नेण्यात आलं. त्यावेळी एक दोषी जमिनीवर पडून आयुष्याची भीक मागत होता तर दुसरा दयेची याचना करत होता. परंतु फाशी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना जबरदस्तीने त्यांना आणावं लागलं. तुरूंग अधिकाऱ्याच्या इशाऱ्यानंतर बरोबर साडेपाच वाजता फाशी देणाऱ्या पवनने खटका खेचला आणि सर्व दोषी १२ फूट खोल लटकले.

अंतिम निकालानंतर दोषींची अशी होती शेवटची रात्र

जेव्हा दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले की फाशी थांबवण्यासाठी कोणतेही ठोस कारण नाही, तेव्हा हे स्पष्ट झाले की. आता दोषींना फासावर जाण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. मुकेश आणि विनय यांनी फाशीच्या सुमारे ८ तास आधी रात्रीचं जेवण केलं. पण पवन आणि अक्षयने काहीही खाण्यास नकार दिला. आपल्या सेलमध्ये सर्व दोषी एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर लोळत होते. त्यांना अजिबात झोप लागत नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव आणि डोक्यात विचारांचं काहून सुरु असल्याचं दिसून येत होत. पहाटे चार वाजेच्या  सुमारास सर्व दोषींना जागं करण्यात आलं आणि त्यांना आंघोळ करण्यास सांगितलं. पण त्यापैकी दोघांनी आंघोळ करण्यास नकार दिला. त्यानंतर शेवटची इच्छा म्हणून त्यांना सकाळचा नाष्टा हवा का? अशी विचारणा देखील करण्यात आली. पण कुणीही त्यास होकार दिला नाही. त्यानंतर या चौघांनाही फासावर लटकवण्यात आलं.

आरोपींना फाशी, निर्भया झिंदाबादच्या घोषणा

निर्भयाच्या चारही दोषींना फाशी दिल्यानंतर त्यांचे मृतदेह जवळजवळ अर्धा तास टांगलेल्या अवस्थेतच होते.  सकाळी ६ वाजेपर्यंत हे मृतदेह खाली उतरविण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी दोषींची तपासणी केली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं. यावेळी दुसरीकडे तिहार जेलबाहेर लोक 'निर्भया झिंदाबाद' अशा घोषणा देत होते. यावेळी हातात पोस्टर घेऊन लोक न्यायपालिकेचे आभार मानत होते.

'अशा दोषींच्या मनात भीती निर्माण होईल'

दरम्यान, दोषींना फासावर लटकविल्यानंतर निर्भयाच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'दोषी फाशी टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. पण आमच्या वकिलांनीही ही लढाई चालू ठेवली. जे प्रत्येक क्षणी आमच्याबरोबर होते. दोन्ही बाजूंनी समान लढाई झाली आणि शेवटी सत्याचा विजय झाला. दरम्यान, या प्रकरणानंतर आम्ही आमचे वकिल आणि हितचिंतकांशी चर्चा करुन कायद्यातील त्रुटी शोधून काढू आणि मग सरकारला भेटून त्या त्रुटी दूर करण्यासाठी आग्रह धरू. चूक हे नेहमी चूकच असतं. आज अशा दोषींच्या मनात भीती निर्माण होईल.

'उशिरा का होईना पण न्याय मिळाला'

निर्भयाच्या वकील सीमा कुशवाहा म्हणाल्या की, 'ज्याप्रमाणे या चारही जणांनी जे भयंकर कृत्य केलं होतं. तसं कृत्य तर प्राणी देखील करत नाहीत. आज या चारही दोषींना फाशी देण्यात आली असून त्यांना योग्य तीच शिक्षा झाली आहे. या प्रकरणाशी संबंधित माझा अनुभव फारच वेगळा होता. उशिरा का होईना पण निर्भयाला न्याय मिळाला. आम्ही निर्भयाला न्याय मिळवून देऊ शकलो हीच काय ती आनंदाची बाब आहे. आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे की, अशा सर्व दोषींना देशात फाशीची शिक्षा व्हावी. दोषींच्या वकिलांचा व्यवहार हा कधीही स्वीकाहार्य असणार नाही.

'न्याय मिळाला'

दोषींना फाशी दिल्यानंतर निर्भयाची आईने आपली प्रतिक्रिया दिली. 'अखेर त्यांना फाशी देण्यात आली. ही पहिलीच वेळ आहे की, चारही दोषींना एकत्र फाशी देण्यात आली आहे. आजचा दिवस आपल्या महिला आणि मुलींसाठी आहे. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज मी सर्व न्यायालये, सरकारे आणि कायद्याचे आभार मानते. ज्या पद्धतीने फाशी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला गेला, तरीही आम्हाला याच कायद्याद्वारे शेवटी न्याय मिळाला.  माझ्या मुलीला न्याय मिळाला आणि पुन्हा एकदा उशिरा न्याय मिळाला. पण त्यामुळे प्रत्येकाचा न्याय प्रणालीवर विश्वास कायम राहील. आमच्या देशातील मुलींना न्याय मिळावा यासाठी आमचा संघर्ष यापुढेही सुरूच राहील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...