अखेर पाकची कबुली; पाकिस्तानी दहशतावद्यांनीच 26/11 हल्ला घडवून आणला; इम्रान खान यांच्या पक्षाने सत्य केलं कबूल

पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खानच्या (Imran Khan) पक्षाने बुधावरी रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे एडिटर अन चीफ अर्णब गोस्वामीच्या (Arnab Goswami) डिबेटमध्ये 26/11 च्या आतंकवादी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.

The 26/11 attacks were carried out by Pakistani terrorists
पाकिस्तानी दहशतावद्यांनीच 26/11 हल्ला घडवून आणला  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • 26/11 चा दहशतवादी हल्ला नोव्हेंबर 2008 साली मुंबई येथे करण्यात आला होता.
  • यात नऊ दहशतवाद्यांसह 174 नागरिक मारले गेले होते.
  • दहशवादी अली बाबरलाही पाकिस्तान लष्कर आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस दहशतवादी प्रशिक्षण दिलं होतं.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खानच्या (Imran Khan) पक्षाने बुधावरी रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे एडिटर अन चीफ अर्णब गोस्वामीच्या (Arnab Goswami) डिबेटमध्ये 26/11 च्या आतंकवादी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. पाकिस्तान तहरीक-ए- इंसाफ (पीटीआय) चे प्रवक्ता अब्दुल समद याकूब (Abdul Samad Yaqoob) यांनी मान्य केले की, मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अजमल आमिर कसाब (Mohammed Ajmal Amir Kasab) आणि इतर दहशतवादी पाकिस्तानचे होते. 

26/11 चा दहशतवादी हल्ला नोव्हेंबर 2008 साली मुंबई येथे करण्यात आला होता.  लश्कर-ए-तैयबा (एलईटी) मुंबईत 12 ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब स्फोट केला होता. यामध्ये नऊ दहशतवाद्यांसह 174 नागरिक मारले गेले होते.  मुंबई पोलिसांना अजमल कसाब या एका दहशतवाद्याला जिवंत पकण्यात यश आले होते. अजमल कसाबला 12 नोव्हेंबर 2012 साली सकाळी  7:30  वाजता फाशी देण्यात आली होती. 

दरम्यान, भारतीय सैन्याने ताब्यात घेतलेला दहशवादी अली बाबर पात्रानेही कॅमेरासमोर कबुल केले आहे की, त्याला पाकिस्तानी सैन्य आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) ने प्रशिक्षित केले होते. त्याने मीडियाशी बोलताना सांगितले की, त्याच्या आजारी आईच्या उपचारासाठी  25,000 रुपयांची अर्थिक मदत करण्यात आली होती. तसेच त्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मिरमध्ये घुसखोरी करण्यास देखील मदत केली होती.

याशिवाय त्याने पाकिस्तानच्या कामाचा देखील पर्दाफाश करताना तरूणांना इस्लाम धर्म धोक्यात आहे. मी गरीब आहे. मी एका मुलाला भेटलो जो  लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) चा होता. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी लगेच काम करण्यास सुरूवात केली. माझ्या एका मोठ्या बहिणीची आणि एका भावाचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान मेजर जनरल (रि) जीडी बख्शी यांनी प्रकरणावरुन पाकिस्तानवर निशाणा साधला. ते म्हणाले की, पाकिस्तान सैन्याच्या एक किमीच्या परिसरात ओसामा होता. असा दावा केला जात आहे की, ओसामा तोरा बोरा गुहेत होता. परंतु मुळात ओसामा एका बगंल्यात होता. जो बंगला त्याने आपल्या पत्नीसाठी घेतला होता.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी