POSCO ची आठवण करून देणारे हे आंदोलन: JSW प्लांटच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा संताप, पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक जखमी, #WATCH video

tension against proposed jsw plant : ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील जिंदाल स्टील वर्क्स (JSW) स्टील प्लांटला विरोध करणारे गावकरी आणि पोलिस यांच्यात संघर्ष झाल्यानंतर तणाव वाढला. प्रत्यक्षात स्टील प्लांटच्या जागेवरून सुपारीची बाग हटवण्यास ग्रामस्थांचा विरोध होता. दरम्यान, जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

The agitation is reminiscent of POSCO: villagers angry over JSW plant protest, several injured in police baton charge
POSCO ची आठवण करून देणारे हे आंदोलन: JSW प्लांटच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा संताप, पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक जखमी, #WATCH video  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील जिंदाल स्टील वर्क्स (JSW) स्टील प्लांटला विरोध
  • पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक गावकरी जखमी झाले
  • प्लांटच्या जागेवरून सुपारीची बाग हटवण्यास ग्रामस्थांचा विरोध होता.

जगतसिंगपूर : ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील ढिनकिया गावात प्रस्तावित जिंदाल स्टील वर्क्स (JSW) प्लांटवरून शुक्रवारी ग्रामस्थांचा भडका उडाला. पोलिसांनी गावकऱ्यांवर लाठीचार्ज केला, त्यात अनेकजण जखमी झाले. यानंतर परिसरात तणाव पसरला. हा संघर्ष पॉस्को प्लांटविरोधातील प्रदीर्घ आंदोलनाची आठवण करून देणारा आहे. (The agitation is reminiscent of POSCO: villagers angry over JSW plant protest, several injured in police baton charge)

वृत्तानुसार, ढिंकिया गावातील सुपारीच्या बागा प्रस्तावित प्रकल्प उभारण्यासाठी नष्ट करायची आहे, त्यामुळे ग्रामस्थ संतापले. त्यांनी प्रशासनांशी संर्षघ सुरू केला आहे. ओडिशातील POSCO स्टील प्लांटला अशाच प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला आणि दीर्घ आंदोलनानंतर 2017 मध्ये हा मेगा प्रकल्प रद्द करावा लागला. जेएसडब्ल्यू प्लांटविरोधात गावकऱ्यांचे हे आंदोलनही त्याच दिशेने पुढे सरकत आहे. दक्षिण कोरियाच्या जागतिक दर्जाच्या मोठ्या स्टील कंपनी पोस्कोला दिलेली जमीन नंतर ओडिशा सरकारने JSW ला दिली जेणेकरून ते या जमिनीवर त्यांचा एकात्मिक स्टील प्लांट उभारू शकेल.

लाठीचार्जमध्ये 40 ग्रामस्थ जखमी

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत 40 जण जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुले आणि वृद्धांची संख्याही मोठी आहे. दुसरीकडे, या चकमकीत अनेक पोलीस जखमी झाल्याचा दावा पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. जिल्हा प्रशासन सुपारीच्या बागांची नासधूस करत असून, लोकांना जबरदस्तीने घराबाहेर काढले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी