Dispute over Taj Mahal: आज ताजमहल उद्या न्यायाधीशांच्या चेंबर पाहणार का; अलाहाबाद हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना झापले

ग्रा येथील सुप्रसिद्ध ताज महालमधील (Taj Mahal) 22 खोल्या उघडण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज अलाहाबाद (Allahabad) उच्च न्यायालयाच्या (High Court) लखनऊ (Lucknow  bench) खंडपीठासमोर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने  यावेळी याचिकाकर्त्यांना चांगलेच झापले. आज तु्म्ही ताज महालमधील 22 खोल्या पाहण्यासाठी याचिका दाखल केली आहे. उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाण्याची परवानगी मागाल, असे म्हणत न्यायालयाने फटकारलं.

अलाहाबाद हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना झापले
The Allahabad High Court slapped the petitioners  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • ताज महालमधील 22 खोल्या उघडल्या जाव्यात आणि आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI) कडून तपासणी केली पाहिजे.
  • याचिकेवर न्या. डी. के. उपाध्याय आणि न्या. सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
  • उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले.

Taj Mahal PIL:  आग्रा येथील सुप्रसिद्ध ताज महालमधील (Taj Mahal) 22 खोल्या उघडण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज अलाहाबाद (Allahabad) उच्च न्यायालयाच्या (High Court) लखनऊ (Lucknow  bench) खंडपीठासमोर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने  यावेळी याचिकाकर्त्यांना चांगलेच झापले. आज तु्म्ही ताज महालमधील 22 खोल्या पाहण्यासाठी याचिका दाखल केली आहे. उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाण्याची परवानगी मागाल, असे म्हणत न्यायालयाने फटकारलं. यासोबत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना एमए करत नेट परीक्षा उत्तीर्ण करून जेआरएफसाठी पात्र होण्याचा सल्ला दिला आहे. 

ताज महालमधील 22 खोल्या उघडल्या जाव्यात आणि आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI) कडून त्याची तपासणी करण्यात, यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या याचिकेवर न्या. डी. के. उपाध्याय आणि न्या. सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. याचिकार्त्यांच्या वकीलांनी सांगितले की, देशातील नागरिकांना ताज महालबाबत सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. आम्ही माहितीच्या अधिकारातंर्गत माहिती मागितली. मात्र, ती माहिती देण्यात आली नाही. ताज महालमध्ये एखादी वस्तू लपवण्यात आली असेल तर त्याची माहिती नागरिकांना द्यायला हवी. ताजमहालची जमीन कोणाची आहे, हा आमचा मुद्दा नसून या बंद खोलीत काय आहे, हे जाणून घ्यायचं असल्याचं याचिकाकर्त्याने म्हटले होते.

उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला झापले 

उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले आहे. तु्म्ही आधी एमए करा, त्यानंतर नेट परीक्षा उत्तीर्ण करून जेआरएफसाठी पात्र होऊन या विषयावर संशोधन करावे. एखाद्या विद्यापीठाने तुम्हाला संशोधन करण्यापासून रोखल्यास  कोर्टात दाद मागवी, असेही खंडपीठाने याचिकाकर्त्याला सुनावले. ताज महाल कोणी बनवला याची माहिती तुम्हाला नाही का, ताजमहालचे वय काय, ते कोणी बनवले याची माहिती देण्यासाठी आम्ही येथे बसलो आहोत का, असा सवालही उच्च न्यायालयाने केला. जनहित याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेला  हास्यास्पद करू नका ,असेही न्यायालयाने म्हटले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी