इमरान खानच्या 'या' गोष्टीला चिडून हल्लेखोरानं झाडली गोळी, कबुलीजबाबात सांगितलं कारण

इमरान खान यांच्यावर गोळीबार का करण्यात आला यावरुन मोठा वाद निर्माण झाला. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोराला पकडल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला असून जबाब नोंदवला आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने म्हटले आहे, "मी इमरान यांना मारण्यासाठी आलो कारण ते लोकांची दिशाभूल करत होते." गोळीबारात इमरान जखमी झाले आहेत.

 The assailant shot at Imran Khan in anger over 'this' thing
'या' गोष्टीला चिडून हल्लेखोरानं इमरान खानवर झाडली गोळी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लष्कराचा विश्वास गमावल्यामुळे एप्रिलमध्ये इमरान खान यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते.
  • इमरान लोकांची दिशाभूल करत आहेत, मला हे पाहिले गेले नाही, म्हणून मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.
  • पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाने निवडणुका मागे घेण्याची मागणी केली आहे.

लाहौर :  पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान ( Former Prime Minister) इमरान खान (Imran Khan) यांच्यावर एका सभेदरम्यान गोळीबार (firing) झाला. या घटनेमध्ये इमरान खान जखमी झाले असून त्यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. इमरान खान अध्यक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (Tehreek-e-Insaf party) या पक्षाने निवडणुका मागे घेण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी तहरीक-ए-इन्साफ पक्षाने लाहोर ते इस्लामाबाद असा मोर्चा काढला. या मोर्चादरम्यानच इमरान खान यांच्यावर गोळीबार झाला. दरम्यान गोळीबार करणारा हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.  (The assailant fired a shot because of Imran Khan's 'this' thing, reason was stated in the confession)

अधिक वाचा  : विराट कोहलीच्या शत्रूंना रोहितने दिले सडेतोड उत्तर

इमरान खान यांच्यावर गोळीबार का करण्यात आला यावरुन मोठा वाद निर्माण झाला. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोराला पकडल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला असून जबाब नोंदवला आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने म्हटले आहे, "मी इमरान यांना मारण्यासाठी आलो कारण ते लोकांची दिशाभूल करत होते." गोळीबारात इमरान जखमी झाले आहेत.

अधिक वाचा  : बिकिनी परिधान करुन 43 वर्षीय अभिनेत्रीने पाण्यात लावली आग

चौकशीदरम्यान हल्लेखोर म्हणाला, "इमरान लोकांची दिशाभूल करत आहेत, मला हे पाहिले गेले नाही, म्हणून मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मी एकटा आहे, माझ्या मागे कोणी नाही.  ज्या दिवसापासून त्यांनी लाहौरहून निघाले त्या दिवसापासून मी त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होतो. मी दुचाकीवर एकटाच आलो आहे. बाईक कुठे आहे या प्रश्नावर हल्लेखोराने सांगितले की, मी माझ्या मामाच्या दुकानात लावली केली आहे. माझ्या मामाचे मोटरसायकलचे दुकान आहे.

दरम्यान,  गोळीबारात जखमी झाल्यानंतर इमरान खान यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. SUV वर नेत असताना त्यांच्या  उजव्या पायावर पट्टी बांधलेली दिसली होती. माजी क्रिकेटर माजी पंतप्रधान इमरान खान यांनी  सरकारच्या विरोधातील आझादी मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. गोळीबार झाला त्यावेळी ते ट्रकवर उभे होते. 
जिओ न्यूज अनुसार, शुक्रवारच्या दुपारी पाकिस्तानच्या वझिराबादमधील झफऱ अली खान चौकात इमरान खान यांच्या पक्षाचा ‘हकीकी आझादी मोर्चा’ पोहोचला तेव्हा ही घटना घडली. लाहोर ते इस्लामाबाद असा हा मोर्चा असून आज हा मोर्चा इस्लामाबादला पोहोचणार होता.

अधिक वाचा  : द.आफ्रिकेच्या पराभवानंतर बदललं पॉईंट्स टेबलचं समीकरण

मोर्चा मुख्य चौकात आल्यानंतर अचानक गोळ्या झाडल्याचे आवाज आल्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. लोकांची पळापळ सुरू झाली. या गोंधळात इमरान खान यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लागलीच रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे रवाना केलं. इकचे पोलिसांनी तातडीने पावलं उचलत गर्दीतून हल्लेखोराला हेरलं आणि त्याला अटक केली. याच दरम्यान इमरान खानही जखमी झाल्याचं सांगत आलं.

दरम्यान, लष्कराचा विश्वास गमावल्यामुळे एप्रिलमध्ये इमरान खान यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. गेल्या अनेक दिवसांपासून, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे 70 वर्षीय प्रमुख खान वेगवेगळ्या ठिकाणी "हकीकी आझादी मार्च" आयोजित करताना कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांना लक्ष्य करत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी