ज्या मुलीशी विवाह करत होता मुलगा, ती निघाली त्याची सख्खी बहीण, आईच्या डोळ्यात आले पाणी

चीनमध्ये एका लग्नादरम्यान एक चमत्कारिक प्रकार घडला. इथे एका नवऱ्या मुलीला तिची खरी आई मिळाली. रंजक गोष्ट अशी की या नवऱ्या मुलीची खरी आईच तिची सासू होणार होती. साधारण 20 वर्षांनी त्यांची भेट झाली.

Bride and her mother
ज्या नवऱ्या मुलीशी विवाह करत होता नवरा मुलगा, ती निघाली त्याची सख्खी बहीण, आईच्या डोळ्यात आले पाणी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • चीनमध्ये एका लग्नात पाहायला मिळाला रंजक प्रकार
  • लग्न करणार होते वर आणि वधू, निघाले सख्खे बहीण-भाऊ
  • लग्नातील वधू निघाली वराची लहानपणी हरवलेली बहीण

पेइचिंग: चीनमध्ये (China) एका लग्नसमारंभावेळी (marriage ceremony) एक अजब प्रकार (amazing incident) पाहायला मिळाला. या लग्नात वर (groom) आणि वधू (bride) विवाहबंधनात (marriage) अडकणार होते तेव्हाच वराच्या आईची (groom’s mother) नजर आपल्या होणाऱ्या सुनेच्या (daughter-in-law) हातांवर (hands) गेली. तिचे हात पाहून वराची आई चकितच (amazed) झाली आणि रडू (cry) लागली. ही वधू ही त्या वराची लहानपणीच हरवलेली बहीण (sister) निघाली. तिच्या हातावर एक विशिष्ट चिन्ह (particular symbol) काढलेले होते जे पाहून तिच्या आईने तिला लगेच ओळखले.

वधूच्या सध्याच्या आईवडिलांनी तिला घेतले होते दत्तक

ही घटना चीनच्या जिआनग्सू प्रांतातली आहे. हा विवाह 31 मार्च रोज होणार होता. चिनी माध्यमांच्या बातम्यांनुसार या वधूच्या हातावरील चिन्ह पाहून तिच्या सध्याच्या आईवडिलांकडे चौकशी केली गेली. यावेळी कळले की साधारण 20 वर्षांपूर्वी त्यांनी या मुलीला दत्तक घेतले होते आणि हे आत्तापर्यंत गुपित होते. तिच्या सध्याच्या वडिलांनी सांगितले की त्यांना ही मुलगी अनेक काळापूर्वी रस्त्याच्या कडेला मिळाली होती.

खरी परिस्थिती समोर येताच रडू लागली नववधू

या वधूच्या सध्याच्या पालकांनी सांगितले की तेव्हापासून ही मुलगी त्यांच्याचसोबत राहते. या खुलाशानंतर आपल्या लग्नाबद्दल अतिशय खुशीत असलेली वधू रडू लागली. तिला आपल्या खऱ्या आईवडिलांबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. तिने सांगितले की हा दिवस तिच्या लग्नाच्या दिवसापेक्षाही जास्त आनंदाचा आहे.

शेवटी झाले की नाही या नवरानवरीचे लग्न?

मात्र इतके होऊनही त्यांचे लग्न थांबले नाही. या दोन्ही कुटुंबांना या लग्नावर काहीच आक्षेप नव्हता. जेव्हा 20 वर्षांपूर्वी ही मुलगी हरवली तेव्हा तिच्या खऱ्या आईबाबांनी एका मुलाला दत्तक घेतले होते. आता त्यांच्या दत्तक मुलाचा विवाह त्यांच्या खऱ्या मुलीशी झाला आहे. या दोन्ही कुटुंबांनी या चमत्कारिक परिस्थितीत झालेल्या या विवाहाचा आनंद साजरा करत या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी