PM Modi interacts with soldiers : सर्जिकल स्ट्राइकमधील तुमच्या भूमिकेवर देशाला गर्व, नौशेरामध्ये पंतप्रधान मोदींनी साधला जवानांशी संवाद

PM Modi interacts with soldiers :  दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सीमेवर तैनात (Deployed ) जवानांना (soldiers ) भेट घेऊन दिवाळी साजरी केली

PM Modi interacts with soldiers
नौशेरामध्ये पंतप्रधान मोदींनी साधला जवानांशी संवाद   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • नौशेरा सेक्टरमध्ये तैनात असलेल्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी
  • सर्जिकल स्ट्राईकमध्ये ब्रिगेडने निभावलेल्या भूमिकेवर देशाला गर्व - पंतप्रधान मोदी
  • प्रत्येक व्यक्ती एक दिवा लावून वीरत्वासाठी, शौर्यासाठी, पराक्रमासाठी शुभेच्छा देतील - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Modi interacts with soldiers : नौशेरा :  दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सीमेवर तैनात (Deployed ) जवानांना (soldiers ) भेट घेऊन दिवाळी साजरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी (Diwali) साजरी करण्यासाठी नौशेरा सेक्टरच्या दौऱ्यावर असून त्यांनी येथील तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधला. 

देशासाठी ज्या सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांना नमन केलं. जवानांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, सीमेवरती जे जवान देशाचे संरक्षण करतात. मी प्रत्येक वर्षी त्यांच्या सोबत दिवाळी साजरा करत असतो.  आज मी जवानांसाठी १३० कोटी देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणले आहेत. जवान हे भारत मातेचं सुरक्षा कवच आहेत. जवानांमुळे देशातील इतर नागरिक शांतपणे झोपत आहेत आणि सणांच्या वेळी शांती आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात बोलताना पुढे म्हणाले की, आपण नौशेरामध्ये पंतप्रधान म्हणून आलेलो नसून इथल्या जवानांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आलो असल्याचं मोदी म्हणाले. “प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावी. मलाही वाटतं की मी दिवाळी माझ्या कुटुंबासोबत साजरी करावी. म्हणूनच मी इथे दिवाळी साजरी करतो. कारण तुम्ही माझे कुटुंबीय आहात. मी इथे पंतप्रधान म्हणून आलेलो नाही. मी तुमच्या परिवारातला एक सदस्य म्हणून आलोय. आपल्या कुटुंबियांसोबत आल्यानंतर जसं वाटतं, तसंच तुमच्यासोबत आल्यावर मला वाटतं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

आज संध्याकाळी भारताचा प्रत्येक नागरीक दिवाळीनिमित्ताने एक दिवा लावून तुमच्या वीरत्वासाठी, तुमच्या शौर्यासाठी, तुमच्या पराक्रमासाठी लावून तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा देईल”, असं देखील मोदी यावेळी म्हणाले.दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौशेरा सेक्टरमध्ये तैनात असलेल्या जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं. “नौशेराने प्रत्येक युद्धाचं, प्रत्येक कट-कारस्थानाचं प्रत्युत्तर दिलं आहे.

स्वातंत्र्यानंतर शत्रूंनी या भागावर नजर ठेवली आहे. पण मला आनंद आहे की नौशेराच्या वीरांच्या शौर्यासमोर सर्व कारस्थानं अपयशी ठरली आहेत. भारतीय सैन्याची ताकद काय असते, याचा अंदाज शत्रूला सुरुवातीच्या दिवसांमध्येच आला होता”, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. नौशेरामधील ब्रिगेडची सर्जिकल स्ट्राईकमध्ये निभावलेल्या भूमिकेसाठी सर्व देशाला तुमचा गर्व आहे. 
पीएम मोदी म्हणाले, प्रथम सुरक्षा उपकरणे आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी वर्ष लागत होते. पण आता जुन्या गोष्टी संपवण्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर बनावे लागेल.  सीमेला लागून असलेल्या भागांशी संपर्क सुधारला आहे. लडाख असो, अरुणाचल प्रदेश असो, जैसलमेर असो, अंदमान निकोबार बेटे असोत. यामुळे आमची तैनाती क्षमता सुधारली असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी