देशातील लसींचा तुटवडा संपला; राज्यांकडे 10 कोटी डोस शिल्लक, आतापर्यंत देण्यात आले 97.65 कोटी डोस

: कोरोना (Coronavirus) महामारी (Epidemic) आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणचं महत्त्वाचे असल्याने देशात लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेवर अधिक भर दिला जात आहे.

The country's vaccine shortage is over
देशातील लसींचा तुटवडा संपला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लसींची संख्या मागील एक महिन्यात दुप्पट झाली आहे.
  • रविवारपर्यंत लसीकरण मोहिमेंतर्गत राज्यांकडे 10 कोटीहून अधिक लसीचे डोस पडून होते.
  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना किमान 100 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : कोरोना (Coronavirus) महामारी (Epidemic) आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणचं महत्त्वाचे असल्याने देशात लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेवर अधिक भर दिला जात आहे. यासाठी लसींचा स्टॉक (Vaccine Stock) सतत वाढवला गेला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, विविध राज्यांमध्ये अद्याप वापरल्या न गेलेल्या लसींची संख्या मागील एक महिन्यात दुप्पट झाली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातील ही संख्या 5 कोटीच्या आसपास होती, ही वाढून आता 10 कोटी झाली आहे. 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की राज्यांकडे लसीकरणासाठी पुरेशे डोस आहेत. नव्या आकडेवारीनुसार, रविवारपर्यंत लसीकरण मोहिमेंतर्गत राज्यांकडे 10 कोटीहून अधिक लसीचे डोस पडून होते.  आकडेवारीनुसार, एका आठड्याआधी सुमारे 8 कोटी डोस उपलब्ध होते. या महिन्याच्या सुरुवातीला ही संख्या जवळपास पाच कोटी होती. केंद्र सरकारच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं, की दैनंदिन लसीकरणाच्या तुलनेत उपलब्धता भरपूर वाढली आहे. लसींचा साठा वाढल्याने आम्ही राज्यांना एकाच दिवसात अधिकाधिक लोकांचे लसीकरण करण्यास सांगत आहोत. आता लसीकरणाचा अजिबातही तुटवडा नाही.

लसीच्या पुरवठ्यातील वाढीचे कारण देशातील एकूण लस उत्पादन वाढ आणि उत्तम रसद व्यवस्था असल्याचे सांगितले गेले आहे. राज्यांकडे आता सुमारे 22.2 कोटी कोविडशील्ड डोस आहेत. त्याचबरोबर, लसीचे सुमारे कोव्हॅक्सिन लसीचे 60 लाख डोसही राज्यांकडे आहेत. पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) स्थानिक पातळीवर कोविशील्ड या ब्रँड नावांतर्गत ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका लस तयार करत आहे. भारत बायोटेक कोव्हॅक्सिनची निर्मिती करत आहे. 

एका अधिकाऱ्यानं म्हटलं, की आधी राज्ये अनेकदा लसींच्या तुटवड्याबाबत तक्रार करत असत. तेव्हा आम्ही त्यांना संयम बाळगण्यास सांगितले. कारण कंपन्या आपल्या लस उत्पादनात वेग आणण्याच्या प्रक्रियेत होत्या. आता उत्पादन प्रक्रिया अधिक वेगाने सुरू आहे. रविवारपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना किमान 100 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत लोकांना 97.65 कोटी डोस देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी