पोलिसांच्या स्पेशल सेलमधील इंस्पेक्टरचा कारमध्ये सापडला मृतदेह  

Delhi Police Inspector found dead: दिल्लीत एका कारमधून पोलिस निरीक्षकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीस आता अधिक तपास करत आहेत. 

the dead body of the inspector of the special cell of police found in the car he was part of the investigation team of delhi riots
पोलिसांच्या स्पेशल सेलमधील इंस्पेक्टरचा कारमध्ये सापडला मृतदेह  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • दिल्ली पोलिसातील एका पोलीस निरीक्षकाचा मृतदेह  कारमध्ये सापडला संदिग्ध अवस्थेत
  • दिल्लीच्या रामपुरा भागात पोलीस निरिक्षक विशाल खानवलकर गाडीत मृत सापडले
  • पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसातील एक पोलीस निरीक्षकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. स्पेशल सेलमध्ये तैनात असलेल्या पोलीस निरीक्षकाचा मृतदेह केशवपुरम पोलिस ठाण्याच्या रामपुरा भागातील एका कारमधून सापडला. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. दरम्यान, आतापर्यंत या पोलिसाचा नेमका मृत्यू कशामुळे झालाय हे अद्याप समजू शकलेले नाही. मृत पोलीस निरिक्षकाचं नाव विशाल खानवलकर (वय ४५ वर्ष) असल्याचं समजतं आहे. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, पोलीस निरिक्षक विशाल खानवलकर हे दिल्ली दंगलीचा तपास करणाऱ्या स्पेशल सेलच्या पथकात होते. दरम्यान, खानवालकर यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूबाबत कळविण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका दुकानासमोर उभी होती गाडी 

पोलिसांच्या स्पेशल सेलमध्ये तैनात असलेले पोलिस निरीक्षक विशाल खानवलकर हे १९९८ च्या बॅचचे अधिकारी होते. त्यांचा मृतदेह कारमधील चालकाच्या सीटवर आढळून आला. प्राथमिक तपासणीत असं समोर आलं आहे की, रामपुरा येथील एका दुकानासमोर सकाळी ११ वाजता कार उभी होती. त्यावेळी एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन अशी माहिती दिली की, एक व्यक्ती कारच्या आत बेशुद्धावस्थेत पडलेली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले. 

दरम्यान, पोलिसांनी जेव्हा गाडीची झडती घेतली तेव्हा  सापडलेल्या कागदपत्रांवरून मृत व्यक्ती पोलीस निरीक्षक विशाल खानवलकर असल्याचं समजलं. विशाल हे  दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात राहत होता. गेले काही दिवसांपासून त्यांची पोस्टिंग स्पेशल सेल लोधी कॉलनीच्या कार्यालयात करण्यात आली होती.

सायंकाळी पोलिसांना मिळाली माहिती 

पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलीस म्हणाले की, 'इंस्पेक्टर विशाल खानवलकर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमध्ये कार्यरत होते.' अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'पोलिसांना संध्याकाळी ४.२० वाजता माहिती मिळाली की, केशवपुरममधील रामपुरा मेन रोडवर एका व्यक्ती कारमध्ये बेशुद्ध पडलेली आहे. त्यानंतर एक पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर विशाल यांना पोलिसांनी बीजेआरएम रुग्णालयात नेले जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.' एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 'चौकशीदरम्यान, असं समजलं कील सकाळी ११ वाजेपासून रामपुरा येथील एका दुकानाच्या बाहेर ही कार उभी होती.' 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी