Maharashtra Election 2019 dates: या दिवशी महाराष्ट्रात वाजणार निवडणुकांचं बिगुल

Maharashtra Election:आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र, हरियाणा या तिन्ही राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.

Election Commissioner Sunil Arora
Maharashtra Election 2019 dates LIVE UPDATES: या दिवशी महाराष्ट्रात वाजणार निवडणुकांचं बिगुल  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

 • आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेण्यात आली.
 • या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र, हरियाणा या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.
 • आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ येत्या २१ ऑक्टोबरला होणार आहे.
 • निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर होईल.
 • केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली घोषणा केली आहे.

Maharashtra election 2019 dates: आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र, हरियाणा या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ येत्या २१ ऑक्टोबरला होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान गोणार आहे. तर आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद लाईव्ह अपडेट्स:

 1. महाराष्ट्रात आणि हरियाणात एकाच टप्पात होणार मतदान
 2. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख ७ ऑक्टोबर
 3. उमेदवारांच्या अर्जाची छाननी ५ ऑक्टोबरला होणार
 4. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर
 5. निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबरला निघणार
 6. ६४ ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहेत.
 7. महाराष्ट्रात मतदानासाठी १.८ लाख ईव्हीएचा वापर होणार
 8. दिवाळीआधीच महाराष्ट्राला मिळणार नवे मुख्यमंत्री
 9. महाराष्ट्रात मतमोजणी २४ ऑक्टोबरला होणार मतमोजणी
 10. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार, एकाच टप्पात होणार मतदान
 11. सातारा निवडणूक विधानसभेसोबत नाही
 12. गोंदिया, गडचिरोलीसाठी आयोगाची विशेष सुरक्षा व्यवस्था
 13. प्लास्टिकमुक्त प्रचार साहित्य वापरण्याच्या सुचना
 14. उमेदवारांना २८ लाख खर्च करण्याची मुभा
 15. एकही कॉलम रिकामी ठेवल्यास उमेदवाराचा अर्ज बाद होणार
 16. 2 नोव्हेंबरपूर्वी मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार
 17. उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार
 18. निवडणुकीसाठी महाराष्ट्रात २ पर्यवेक्षक पाठवले जाणार
 19. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरला संपणार, तर हरियाणाची २ नोव्हेंबरपर्यंत मुदत
 20. महाराष्ट्रासह हरियाणात आजपासून आचारसंहिता लागू
 21. महाराष्ट्रात एकूण ८.९४ कोटी मतदार
 22. महाराष्ट्रात २८८ जागांवर निवडणूक होणार, हरियाणात ९० जागांवर निवडणूक होणार
 23. महाराष्ट्रासह हरियाणाच्याही निवडणुका जाहीर होणार 
 24. महाराष्ट्र विधानसभेच्या तारखांची घोषणा होणार
 25. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू
 26. निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांची तारखा जाहीर करणार
 27. थोड्याच वेळात सुरू होणार निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

 2014 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये निवडणुकांच्या तारखांची घोषणा 20 सप्टेंबरला करण्यात आली होती. तर 15 ऑक्टोबरला मतदान झालं होतं आणि निवडणुकीचा निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर झाला होता. 2014 मध्ये झारखंड राज्यात 25 नोव्हेंबरपासून 23 डिसेंबर यामध्ये 5 टप्प्यात मतदान झालं होतं. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक गेल्यावेळी 12 सप्टेंबरला जाहीर झाली होती आणि आचारसंहिता लागली होती. गेल्यावेळीच्या तुलनेत यंदा तारखांची घोषणा करण्यात उशीर झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी