Jammu Kashmir Encounter: कुलगाममध्ये दुसऱ्या दिवशीही चकमक सुरू; चौवीस तासात 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir Encounter: जम्मू कश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) गेल्या 24 तासात चालू असलेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी (security force) तीन दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा (Killed) केला आहे.

Jammu Kashmir Encounter: killed 3 terrorists in 24 hours
Jammu Kashmir Encounter: चौवीस तासात 3 दहशतवाद्यांचा खात्मा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तरुणांना फसवून दहशतवादी बनवण्याच्या कामात शिराजचा सहभाग होता.
  • कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे.
  • श्रीनगरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव अमीर रियाझ असून तो दहशतवादी संघटना गजवातुल हिंदशी संबंधित होता.

Jammu Kashmir Encounter: कुलगाम: जम्मू कश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) गेल्या 24 तासात चालू असलेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी (security force) तीन दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा (Killed) केला आहे. कुलगाममध्ये दोन तर श्रीनगरमध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. कुलगाम (Kulgam) मध्ये चालू असलेल्या चकमकीचा (Encounter) आज दुसरा दिवस आहे. दरम्यान कुलगाम मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख हिजबुल कमांडर शिराज मौली आणि यावर भट्ट अशी झाली आहे.

तरुणांना फसवून दहशतवादी बनवण्याच्या कामात शिराजचा सहभाग होता. तसेच, निष्पाप लोकांच्या हत्येतही त्याचा हात होता. तर त्याचवेळी श्रीनगरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव अमीर रियाझ असे असून तो पुलवामा येथील होता. ठार झालेला अमीर रियाज हा दहशतवादी संघटना  गजवातुल हिंदशी संबंधित होता. जम्मू कश्मीर पोलिसांच्या मते, दहशतवादी अमीर रियाझ याला आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी देण्यात आली होती.  काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, श्रीनगर चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. याचे नाव अमीर रियाझ असून हा पुलवामामधील ख्रेव येथील होता.तो मुजाहिदीन गजवतुल हिंद या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. तो लेथपोरा दहशतवादी हल्ल्यातील एका आरोपीचा नातेवाईक होता, त्याच्याकडे आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी होती.

तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगळ्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली की, येथील बेमिना भागातील हमदानिया कॉलनी भागात संध्याकाळी चकमक सुरू झाली. काश्मीर विभागीय पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की, चकमकीत एक अज्ञात दहशतवादी मारला गेला आहे. या दहशतवाद्याकडून एक एके रायफलसह काही दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान अजून शोध मोहीम सुरू आहे.  

अंतिम अहवाल येईपर्यंत चकमक सुरूच होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. "सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलिस दल) कॅम्प आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ ही कारवाई सुरू आहे,"  दरम्यान, मुजाहिदीन गजवतुल हिंदने "हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असे म्हटले आहे की त्यांच्या तीन कार्यकर्त्यांनी "सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला आहे." यापूर्वी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात चकमक सुरू झाली होती. दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील चावलगाम भागात दहशतवादी असल्याच्या गुप्त माहितीवरून सुरक्षा दलांनी नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, जेव्हा सुरक्षा दल परिसरात शोध घेत होते तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ते म्हणाले की, सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले त्यानंतर चकमक सुरू झाली. त्यांनी सांगितले की, यादरम्यान एक दहशतवादी मारला गेला, ज्याची ओळख पटवली जात आहे. ते म्हणाले की, दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही आणि तो कोणत्या गटाशी संबंधित आहे हेही कळू शकलेले नाही.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी