मुंबई : पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या (Spice Jet) विमानाने (Aircraft) पेट घेतला. स्पाईसजेटचे विमान Sg 725 विमानाला ही आग लागली. या आगीची माहिती मिळताच पाटणा विमानतळावरील सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पायलटनं प्रसंगावधान राखून सर्व 185 प्रवाशांचा जीव वाचला आणि पुढील अनर्थ ठळला आहे.
विमानतळाच्या बाहेर रूग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. कोणतीही गरज पडली तर मेडिकल ट्रिटमेंट देण्यासाठी सुविधा सज्ज आहे. ही आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील बोलवण्यात आल्या आहेत.