वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने आपल्या सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिणीतून जेम्स वेबचा पहिला रंगीत फोटो प्रसिद्ध केला आहे. आजवर पाहिलेली विश्वाची ही पहिली उच्च-रिझोल्यूशन रंगीत प्रतिमा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या व्हाईट हाऊसच्या ब्रीफिंगमध्ये हे पहिले रंगीत फोटो सादर करण्यात आले आहे. ते म्हणाले की, हे एक आश्चर्यकारक चित्र आहे. जी हजारो आकाशगंगांनी भरलेली आहे आणि त्यात निळ्या, नारिंगी आणि पांढऱ्या रंगात रंगलेल्या आजपर्यंतच्या सर्वात धूसर वस्तू आहेत. ही दुर्बिण मानवजातीच्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून घेतलेल्या विश्वाच्या पहिल्या पूर्ण-रंगीत प्रतिमेचे अनावरण केले. सोमवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसमध्ये एका समारंभात, बायडन म्हणाले की, हा एक ऐतिहासिक दिवस आहे, कारण जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली अंतराळ विज्ञान दुर्बिणीने आपल्या विश्वाच्या इतिहासात एक नवीन सादरीकरण केलं आहे.
नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी गेल्या महिन्यात एका ब्रीफिंगमध्ये पत्रकारांना सांगितले की, आम्ही मानवाला विश्वाचे एक नवीन दृश्य देणार आहोत, जे आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.
यापूर्वी, NASA ने त्याच्या सर्वात शक्तिशाली स्पेस टेलिस्कोप जेम्स वेबमधून घेतलेल्या खोल-स्पेसच्या पहिल्या चित्रांपूर्वी एक सुंदर टीझर फोटो जारी केला. यामध्ये नासाचे बहुप्रतिक्षित डीप स्पेसचे फोटो पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले. शास्त्रज्ञांच्या मते, हे शक्तिशाली उपकरण विश्वाच्या उत्पत्तीशी संबंधित अनेक रहस्ये उघडू शकते.
हनीवेल एरोस्पेस येथील वेब टेलीस्कोपच्या फाइन गाईडन्स सेन्सरचे प्रोग्रॅम सायंटिस्ट नील रौलँड्स यांनी सांगितले की, जेव्हा हे चित्र घेण्यात आले. या अंधुक आकाशगंगांमधील तपशीलवार रचना स्पष्टपणे पाहून मी आनंदीत झालो. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, वेब दुर्बिणी पूर्वीच्या कोणत्याही दुर्बिणीपेक्षा अंतराळातील सर्वात दूरचे अंतर पाहण्यास सक्षम आहे.
10 अब्ज डॉलर्सची तयार झालेली दुर्बीण गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि सध्या ती पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किमी अंतरावर सूर्याभोवती फिरत आहे. आपल्या प्रचंड प्राथमिक आरशा आणि उपकरणांच्या मदतीने ही दुर्बीण अंतराळातील इतर दुर्बिणीपेक्षा जास्त अंतर पाहू शकते. दुर्बिणीतील उपकरणे धूळ आणि वायूमधून पाहण्यास सक्षम असतात.