Omicron Variant First Image : Omicron व्हेरिएंटचा पहिला फोटो आला समोर, डेल्टापेक्षा अधिक खतरनाक आहे नवा कोरोना

Omicron Variant First Image : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंट (Variant ) चा पहिला फोटो (Image )समोर आला आहे. अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये जास्त म्युटेशन असल्याचे समोर आले आहे.

The first photo of the Omicron variant came in front
Omicron व्हेरिएंटचा पहिला फोटो आला समोर  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरातील लोक चिंतेत असतानाच पहिला फोटो समोर आला.
  • इटलीची राजधानी रोममधील बम्बिनो गेसु रुग्णालयाने ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फोटो प्रकाशित केला आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ओमिक्रॉन व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" (concern) असल्याचे घोषित केले आहे.

Omicron Variant First Image : नवी दिल्ली:  दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंट (Variant ) चा पहिला फोटो (Image )समोर आला आहे. अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये जास्त म्युटेशन असल्याचे समोर आले आहे. नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगभरातील देश सतर्क झाले असून हवाई वाहतूकीवर निर्बंध लावले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरातील लोक चिंतेत असतानाच पहिला फोटो समोर आला आहे. या व्हेरिएंटचं म्युटेशन इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक आहे. इटलीची राजधानी रोममधील बम्बिनो गेसु रुग्णालयाने ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फोटो प्रकाशित केला आहे. 

दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटनं (B.1.1.529) जगाला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ओमिक्रॉन व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" (concern) असल्याचे घोषित केले आहे. ओमिक्रॉन हा धोकादायक व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन होतो. याशिवाय सुरुवातीच्या पुराव्यांवरून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.  

ओमिक्रॉनच्या फोटोत नेमकं काय आहे?

नव्या व्हेरिएंटवर रिसर्च करणाऱ्या टीमने म्हटले आहे की, ओमिक्रोन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक म्यूटेट होत असल्याचे आपण फोटोमध्ये पाहू शकतो. हा व्हायरस प्रोटीनच्या वरच्या भागात राहतो. जो मानवी कोशिकांवर प्रभाव टाकतो. 

ओमिक्रॉन धोकादायक आहे का? 

जास्त म्युटेट होतोय, याचा असा अर्थ नाही की ओमिक्रॉन अधिक धोकादायक आहे. विषाणूंनी फक्त दुसरा प्रकार निर्माण करून मानवी प्रजाती अधिक अनुकूल बनवली आहे. यासोबतच ते म्हणाले की, या व्हेरिएंटवर आणखी संशोधन सुरू आहे. संशोधन झाल्यानंतरच हा व्हेरिएंट धोकादायक आहे का नाही? हे आम्ही सांगू शकतो. 

जागतिक आरोग्य संघटनेनं काय म्हटलं?

WHO  च्या मते, सुरुवातीच्या पुरव्यात असे समोर आले आहे की, जे लोक आधीच कोरोनाबाधित आहेत, ते पुन्हा ओमिक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित होऊ शकतात. ओमिक्रॉनमुळे पुन्हा संक्रमाणाची भीती आहे. डेल्टा अथवा दुसऱ्या व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे जास्त संसर्ग होत असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत आरटीपीएसीआर टेस्टच्या आधारावरच ओमिक्रॉन व्हेरिएंट झाला की नाही, हे समोर आले आहे.  

फ्रान्समधील 8 लोकांना ओमिक्रॉन संसर्ग झाल्याचा संशय 

फ्रान्समध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराचे 8 संशयित रुग्ण आढळले आहेत. फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, काही प्रवासी गेल्या 14 दिवसांत आफ्रिकेवरून परतले आहेत, त्यापैकी 8 जणांना ओमिक्रॉन संसर्ग झाल्याचा संशय आहे.  या सर्व रुग्णांमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या तपासणीत अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा प्रकारांचे उत्परिवर्तन आढळले नाही, आता पुढील माहिती अनुक्रमणिकेद्वारे गोळा केली जाईल. 

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्यामुळे भारत सरकार आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणांसंदर्भात घेणार निर्णय

जागतिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणें सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. केंद्रीय गृहसचिवांनी रविवारी एक बैठक बोलावली होती. कोरोना विषाणूच्या नव्या ऑमिक्रॉन व्हेरियंटसंदर्भात चर्चा करण्यासाठी गृहसचिवांनी ही बैठक बोलावली होती. निति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल, पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजय राघवन  आणि आरोग्य विभाग, नागरी हवाई उड्डाण विभाग आणि इतर मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी