रात्रीच्या वेळी तरुणीनं लिफ्ट मागितली, गाडी चार किमीवर गेली आणि मग...

Crime News : गिरिडीहमध्ये मुलीला लिफ्ट देणे महागात पडले. आजारपणाच्या नावाखाली तरुणीने त्याला आपल्या जाळ्यात अडकवून लिफ्ट देण्याची विनंती केली. त्यानंतर त्याला एक खोली कोंडून मारहाण करीत सर्व पैसे काढून घेतले

The girl had to be given a lift, the bike rider was caught in her trap and looted all the money
रात्रीच्या वेळी तरुणीनं लिफ्ट मागितली, गाडी चार किमीवर गेली आणि मग...  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली :  झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील मकडपूर येथील रहिवासी धीरज कुमार भदानी याला एका मुलीला लिफ्ट देणे महागात पडले. त्या मुलीने सापळा रचून त्याला एका खोलीत कोंडून त्याला मारहाणही करण्यात आली. त्याच्याजवळ असलेले पैसे व सोनसाखळी हिसकावून घेतली. धीरजच्या कुटुंबीयांना फोन करून 5 लाख रुपये मागितले, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या सरिता देवी आणि सीमा कुमारी या दोन महिलांना अटक करण्यात आली. (The girl had to be given a lift, the bike rider was caught in her trap and looted all the money)

अधिक वाचा : 

Gang Rape : पार्टी करून घरी परतणाऱ्या 17 वर्षीय तरुणीवर मर्सिडिज कारमध्ये सामूहिक बलात्कार

धीरजने पोलिसांना सांगितले की, रविवारी तो त्याच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी दुचाकीवरून धनबादला येत होता. यादरम्यान गोविंदपूरजवळ एक तरुणीने चार-पाच किलोमीटर दूर असलेल्या घरी पोहचविण्याची विनंती करू लागली. त्याने तिला बाईकवर बसवले. दुपारी 1.30 वाजता तिला बीसीसीएलच्या क्वार्टरमध्ये नेण्यात आले. तेथे तिने पाणी पिण्यास सांगितले. तो खाली बसला आणि पाणी पिऊ लागला, तेवढ्यात एक तरुण आला आणि शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्याचे इतर दोन साथीदारही आले. त्यांनीही मारहाणही सुरू केली. यावेळी त्याच्याकडून सात हजार रुपये, मोबाईल फोन, सोनसाखळी, अंगठी असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. धमकावून म्हणाला : बेटा आता अजून पैसे हवेत, नाही मिळाले तर तुकडे तुकडे करून खाणीत फेकून देईन.

अधिक वाचा : 

एेकावे ते नवलच, पतीच्या अफेअरचा संशय, पाच माणसं हायर करुन मैत्रिणींवरच केला रेप

दरम्यान, एक महिला आली आणि तू माझ्या मुलीची इज्जत लुटलीस, असे म्हणत शिवीगाळ करु लागली. तिचे लग्न कसे होणार? तेथे उपस्थित सर्व तरुणांनी याचा न्यूड व्हिडिओ बनवा, असे बोलू लागली, त्यानंतर सर्वांनी धीरजचे कपडे फाडण्यास सुरुवात केली. त्याने विरोध करायचा सुरुवात पण लोकांनी त्याचे कपडे फाडून त्याचा न्यूड व्हिडिओ बनवला.

अधिक वाचा : 

Gang Rape : धक्कादायक! महिलेचे अपहरण करून खंडणी मागितली, पती देऊ शकला नाही रक्कम; जंगलात सामूहिक बलात्कार

व्हायरल करण्याच्या भीतीने धीरजने फोन पेद्वारे 12 हजार रुपये दिले. यानंतरही त्यांनी आणखी पैसे मागितले. यानंतर एका महिलेने लग्नासाठी पाच लाख रुपये मागू लागली. यानंतर धीरजने मेहुणा संजयकुमार गुप्ता यांना फोन करून पैसे घेऊन येण्यास सांगितले. फोनवर बोलणे झाल्यानंतर ते पैसे घेण्यासाठी रणधीर वर्मा चौकात पोहोचल्या. तेथे पोलिसांनी सापळा रचून टोळीला पकडले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी