PM Cares For Children: कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या पाठिशी सरकार, पाठवणार शिष्यवृत्ती

कोरोनाच्या (Corona) काळात अनाथ झालेल्या मुलांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन (PM Cares for Children Scheme) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पीएम केअर फंडातून अनाथ मुलांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती पाठवण्यात येणार आहे.

PM cares for children orphaned by corona
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • इतर योजनांच्या माध्यमातून अशा मुलांसाठी इतर दैनंदिन गरजांसाठी दरमहा ४००० रुपयांची तरतूद
  • योजनेअंतर्गत पीएम केअर फंडातून अनाथ मुलांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती पाठवण्यात येणार
  • कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना मोदी सरकार आर्थिक मदत करणार आहे.

PM Cares For Children: नवी दिल्ली :  कोरोनाच्या (Corona) काळात अनाथ झालेल्या मुलांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन (PM Cares for Children Scheme) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पीएम केअर फंडातून अनाथ मुलांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती पाठवण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनाथ मुलांना शिक्षणासाठी कर्ज दिले जाणार आहे, सरकारच्या या उपक्रमामुळे अशा मुलाच्या भविष्यात मोठा फायदा होणार आहे.   

अनाथ मुलांच्या पाठिशी सरकार भक्कमपणे उभं आहे, या मुलांना सर्व प्रकारची मदत सरकार देईल, असं पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमाच्या वेळी म्हणाले.
पुढे बोलताना पंतप्रधान नागरिकांना उद्देशून म्हणाले की, मी तुमच्याशी कुटुंबातील सदस्य म्हणून बोलत आहे, असं समजा. कोरोनामुळे ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावलं त्यांच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा कठिण काळ होता, त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. अशा मुलांच्या भविष्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं पंतप्रधानांनी सांगितलं.

समस्या कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न

'पीएम केअर फॉर चिल्ड्रन' हा कोरोना बाधित मुलांसमोरील समस्या कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक देशवासी अत्यंत संवेदनशीलतेने या मुलांच्या पाठीशी आहे, असं पंतप्रधान म्हणाले. मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या घराजवळच्या सरकारी किंवा खासगी शाळेत दाखल करण्यात आलं आहे. एखाद्याला व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोनची आवश्यकता असल्यास, पीएम केअर्स त्यातही मदत करणार आहे. 

दरमहा ४ हजार रुपये

इतर योजनांच्या माध्यमातून अशा मुलांसाठी इतर दैनंदिन गरजांसाठी दरमहा ४००० रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. ही मुलं त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण करतील, तेव्हा भविष्यासाठी अधिक पैशांची गरज भासेल. यासाठी 18-23 वर्षे वयोगटातील तरुणांना दरमहा स्टायपेंड मिळेल आणि मुलं 23 वर्षांची झाल्यावर त्यांना 10 लाख रुपये मिळतील, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली.

पांच लाखांपर्यंत मोफत उपचार

मूल आजारी पडल्यास उपचारासाठी पैशांची गरज असते. पण त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आयुष्मान हेल्थ कार्ड या मुलांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रनद्वारे दिलं जात आहे, या अंतर्गत मुलांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी