सरकार लवकरच जारी करणार ‘ई-पासपोर्ट’, महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी होणार निर्मिती

टेक्नोलॉजीमुळे (Technology) अनेक गोष्टी खूपच सोप्या झाल्या आहेत. अनेक वस्तू आणि ठिकाणांची माहिती आपल्याला घरी बसून मिळवता येते. तंत्रज्ञानाचा नागरिकांना अजून जास्त फायदा व्हावा याासाठी सरकार नियमित पासपोर्टच्या (Passport) जागी ई-पासपोर्ट (E-passport) जारी करणार आहे.

The government will soon issue 'e-passport'
सरकार लवकरच जारी करणार ‘ई-पासपोर्ट  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटरला (NIC) ई-पासपोर्ट जारी करण्यासाठी तांत्रिक जबाबदारी सोपवली आहे.
  • नागरिकांना २०२२-२३ च्या सुरुवातीला ई-पासपोर्ट जारी करण्यात येणार
  • ई-पासपोर्ट हा एक कंबाइंड कागद आणि इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट असेल.

नवी दिल्ली : टेक्नोलॉजीमुळे (Technology) अनेक गोष्टी खूपच सोप्या झाल्या आहेत. अनेक वस्तू आणि ठिकाणांची माहिती आपल्याला घरी बसून मिळवता येते. तंत्रज्ञानाचा नागरिकांना अजून जास्त फायदा व्हावा याासाठी सरकार नियमित पासपोर्टच्या (Passport) जागी ई-पासपोर्ट (E-passport) जारी करणार आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री (Union Minister of State for External Affairs) वी. मुरलीधरन (V. Muralitharan) यांनी संसदेत (Parliament) माहिती दिली. नागरिकांना  २०२२-२३ च्या सुरुवातीला ई-पासपोर्ट जारी करण्यात येणार असल्याची योजना आहे. राज्यसभेत वर्ष २०२२ मध्ये ई-पासपोर्ट जारी करण्यासंदर्भातील एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी याबाबत माहिती दिली. 

मुरलीधरन यांनी पुढे माहिती दिली की, परराष्ट्र मंत्रालयाने नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटरला (NIC) ई-पासपोर्ट जारी करण्यासाठी तांत्रिक जबाबदारी सोपवली आहे. ते म्हणाले की, ई-पासपोर्टला इंडिया सिक्योरिटी प्रेस, नाशिकद्वारे तयार केले जाईल. प्रेसने ऑपरेटिंग सिस्टमसोबत ४.५ कोटी ICAO-कंप्लाइंट इलेक्ट्रॉनिक चिप्स खरेदी करण्यासाठी पत्र देखील जारी केले आहे. सध्या ई-पासपोर्टच्या सँपलचे टेस्टिंग सुरू आहे. पूर्णपणे उत्पादन आणि वितरण टेक्निकल इको-सिस्टम आणि इंफ्रास्ट्रक्चर पूर्ण झाल्यावर सुरू होईल. 

कसा असेल ई-पासपोर्ट?

रिपोर्टनुसार, MoS ने माहिती दिली की,  ई-पासपोर्ट हा एक कंबाइंड कागद आणि इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट असेल. ज्यांमध्ये एम्बेडेड रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेटिंफिकेशन (RFID) चिप आणि अँटीना बॅक कव्हरमध्ये एम्बेडेड केलेला असेल. ‘पासपोर्टची महत्त्वाची माहिती डेटा पेजवर प्रिंट होण्यासोबतच चिपमध्ये देखील स्टोर होईल. कागदपत्रे आणि चिपचे वैशिष्ट्ये इंटरनॅशन सिव्हिल ऑर्गेनाइजेशन (ICAO) डॉक्यूमेंट ९३०३ मध्ये सांगण्यात आले आहे. ’सरकारनुसार, यामुळे १५-२० दिवसांऐवजी आता पासपोर्ट केवळ ७ दिवसात जारी करणे शक्य होईल, असं मुरलीधन यांनी सांगितले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी