Haryana Lockdown Updates: कोरोनाचं वाढतं संकट; हरियाणातील पाच जिल्ह्यात लॉकडाऊनसारखे निर्बंध

देशातील अनेक राज्यांत गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधितांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे (Lockdown) संकट पुन्हा एकदा घोंगावू लागले लागले आहे.

Restrictions like lockdown in five districts of Haryana
हरियाणातील पाच जिल्ह्यात लॉकडाऊनसारखे निर्बंध   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्याच्या उद्देशाने सरकारकडून कठोर पाऊल उचलण्यात आले आहेत.
  • गुरुग्राम , फरीदाबाद, अंबाला, पंचकुला आणि सोनीपत या पाच प्रमुख जिल्ह्यांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.
  • दोन जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत हे निर्बंध असणार आहेत.

Haryana Lockdown : गुरुग्राम: देशातील अनेक राज्यांत गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधितांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे (Lockdown) संकट पुन्हा एकदा घोंगावू लागले लागले आहे. याच पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने (Government of Haryana) तर आज नवीन गाईडलाइन्स (Guidelines) जारी करत राज्यातील पाच प्रमुख जिल्ह्यांत लॉकडाऊनसारखे निर्बंध लागू केले आहेत. 

हे निर्बंध पुढील दहा दिवसांसाठी असणार आहेत. वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्याच्या उद्देशाने सरकारकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. गुरुग्राम , फरीदाबाद, अंबाला, पंचकुला आणि सोनीपत या पाच प्रमुख जिल्ह्यांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. दोन  जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. हरियाणातील या पाचही जिल्ह्यांत पुढील 10 दिवस सर्व शाळा-कॉलेज, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, सिनेमागृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुकाने तसेच शॉपिंग मॉल सायंकाळी पाच वाजेपर्यंतच खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांबाबतही नवे निर्देश दिले गेले असून या कार्यालयांत 50 टक्केपेक्षा अधिक उपस्थिती असू नये, असे बजावण्यात आले आहे.

हरियाणात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी राज्यात 26 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 63 झाली आहे. दुसरीकडे दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. 30 डिसेंबर रोजी राज्यात 217 तर 31 डिसेंबर रोजी 427 नवीन रुग्ण आढळले आहेत. ही स्थिती लक्षात घेत राज्य सरकारने तातडीने मोठी पावले टाकत निर्बंध कडक केले आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी