देशात एका दिवसातील सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद, गेल्या 24 तासांत 94,052 नवे कोरोनाबाधीत

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट होताना दिसत आहे.

The highest number of one-day corona deaths
देशात एका दिवसातील सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • बुधवारी एका दिवसात 6148 मृत्यू नोंदविण्यात आले.
  • देशातील संक्रमणाचा दर घसरतोय
  • एका दिवसात 1 लाख 51 हजार 367 रुग्णांना रुग्णालयातून सुटी

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second wave of Corona)  प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट होताना दिसत आहे. यामुळे देशाला थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु, कोरोनामुळे मृत्यू  (Covid 19 Death) झालेल्या रुग्णांचा दररोज समोर येणारा आकडा भयावह आहे. आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 94,052 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 6148 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 लाख 51 हजार 367 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजचे, काल दिवसभरात 63,463 अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे. यापूर्वी मंगळवारी 92,596 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 

आज देशात सलग 28व्या दिवशी कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. 9 जूनपर्यंत देशभरात 24 कोटी 27 लाख 26 हजार कोरोना लसींचे डोस देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 33 लाख 79 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 37 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्क्यांहून अधिक आहे. 

देशातील आजची कोरोनास्थिती : 

एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 91 लाख 83 हजार 121
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 76 लाख 55 हजार 493
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : 11 लाख 67 हजार 952
एकूण मृतांची संख्या : 3 लाख 59 हजार 676
देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.22 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 94 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 5 टक्क्यांच्या कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगातून दुसऱ्या स्थानी आहे. 

राज्यात काल 16,379 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात काल कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच काल कालपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात काल 10 हजार 989 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 16 हजार 379 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल राज्यात 10219 रुग्णांची नोंद झाली होती.  
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,97,304 इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट 95.45 टक्के झाला आहे. काल 261 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात काल एकूण 1,61,864 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 11,35,347 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी