Mathura: मुघल शासक औरंगजेबाने केले होते मथुरेचे 'इस्लामाबाद' तर वृंदावनचे 'मोमिनाबाद'

लोकल ते ग्लोबल
Updated May 22, 2022 | 11:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mathura Latest News | मुघल शासक औरंगजेबाने हिंदूंची केवळ मंदिरेच पाडली नाहीत तर धार्मिक शहरांची नावे देखील बदलली होती. औरंगजेबाने मथुराचे नाव बदलून इस्लामाबाद आणि वृंदावन हे नाव बदलून मोमिनाबाद केले होते.

The Mughal ruler Aurangzeb renamed Mathura
औरंगजेबाने केले मथुरेचे 'इस्लामाबाद' तर वृंदावनचे 'मोमिनाबाद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औरंगजेबाने हिंदूंची केवळ मंदिरेच पाडली नाहीत तर धार्मिक शहरांची नावे देखील बदलली होती.
  • औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीच्या १३ व्या वर्षी श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेचे प्रसिद्ध केशव देव मंदिर तोडले.
  • औरंगजेबाने केले मथुरेचे 'इस्लामाबाद' तर वृंदावनचे 'मोमिनाबाद.

Mathura Latest News | नवी दिल्ली : मुघल शासक औरंगजेबाने हिंदूंची केवळ मंदिरेच पाडली नाहीत तर धार्मिक शहरांची नावे देखील बदलली होती. औरंगजेबाने मथुराचे नाव बदलून इस्लामाबाद आणि वृंदावन हे नाव बदलून मोमिनाबाद केले होते, परंतु ही नवीन नावे राजेशाही कागदपत्रांपुरती मर्यादित राहिली. काही मुघल इतिहासकारांनी देखील त्यांचा वापर केला, परंतु सामान्य जनतेने ही नावे कधीही वापरली किंवा स्वीकारली नाहीत. (The Mughal ruler Aurangzeb renamed Mathura as 'Islamabad' and Vrindavan as 'Mominabad'). 

अधिक वाचा : आज राज ठाकरेंची हायहोल्टेज सभा, जाणून घ्या कधी अन् कुठे?

औरंगजेबाने केले होते नामकरण 

दरम्यान, ही गोष्ट सन १९७० ची आहे, जेव्हा मुघल सम्राट औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीच्या १३ व्या वर्षी श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेचे प्रसिद्ध केशव देव मंदिर तोडले आणि मथुरा आणि वृंदावनची सांस्कृतिक ओळख नष्ट करण्याचा आदेश दिला. तिथे त्यांनी मथुरेचे नाव बदलून इस्लामाबाद आणि वृंदावनचे नाव बदलून मोमिनाबाद केले होते.

राजेशाही कागदपत्रांमध्ये ही नावे लिहिली आहेत

या आदेशाची पूर्ण अंमलबजावणीही करण्यात आली होती. परंतु ही दोन्ही नावे सामान्य लोकांच्या कधीच पसंतीस आली नाहीत आणि ती केवळ मुघल राजघराण्यांपुरतीच मर्यादित राहिली. मथुरेसाठी 'इस्लामाबाद' आणि वृंदावनासाठी 'मोमिनाबाद' असे नाव लिहिण्याची परंपरा कागदपत्रांमध्ये दीर्घकाळ चालू होती. इतिहासकार लक्ष्मी नारायण तिवारी सांगतात की १८ व्या शतकाच्या मध्यात मथुरा-वृंदावन जाट शासकांच्या ताब्यात आले तेव्हा त्यांनी नाणी पाडण्यासाठी मथुरा आणि वृंदावन येथे स्वतःची टांकसाळ अर्थात नाणी बनवण्याचा कारखाना स्थापन केला. 

त्याकाळात फक्त मुघल सम्राट शाह आलमच्या नावाने नाणी जारी केली जात होती. नाण्यांवर फारसीतील मथुरा टांकसाळीच्या नावाने 'इस्लामाबाद' आणि वृंदावन टांकसाळीच्या नावावर 'मोमीनाबाद' असे कोरलेले असायचे. या काळातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि मथुरा-वृंदावनच्या टांकसाळीत टाकलेली ती दुर्मिळ नाणी आजही वृंदावनच्या गोदा विहार मंदिरात असलेल्या ब्रज संस्कृती शोध संस्थेच्या संग्रहात पाहायला मिळतात, जी औरंगजेबाच्या जुलमी धोरणाचा पुरावा देतात. 

'औरंगजेबनामा'मध्ये नाव बदलण्याच्या धोरणाचा उल्लेख 

ब्रज संस्कृती शोध संस्थेचे प्रकाशन अधिकारी गोपाल शरण शर्मा यांनी सांगितले की, मुआसिर आलमगिरी ज्यांचे लेखक मोहम्मद साकी मुस्तैद खान हे सम्राट औरंगजेबाचे दरबारी इतिहासकार होते, हे पुस्तक ब्रज संस्कृती शोध संस्थेच्या ग्रंथालयात जमा करण्यात आले आहे. केशवदेव मंदिराचा औरंगजेबाने केलेला विध्वंस आणि त्या जागी औरंगजेबाने मशीद बांधल्याचे व मथुरा आणि वृंदावनाची नावे बदलण्याचे स्पष्ट वर्णन त्यांनी या इतिहासाच्या पुस्तकात करण्यात आले आहे. या फारसी ग्रंथाचे हिंदी अनुवाद मुन्शी देवीप्रसाद यांनी 'औरंगजेबनामा' या नावाने सन १९०९ मध्ये केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी