बापरे ! चीनने बनवला नवीन सूर्य, खऱ्या सूर्यापेक्षा आहे दहा पट जास्त शक्तीशाली

आपण म्हणतो की, या ब्रह्मांडमध्ये असलेल्या प्रत्येक घटकाच्या जीवनसाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे.

The new sun made by China
चीनने बनवला नवीन सूर्य; खऱ्या सूर्यापेक्षा आहे दहा पट जास्त   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • चीनने बनवला कृत्रिम सूर्य, डेली मेलच्या अहवालात केला दावा
  • कृत्रिम सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा दहा पट शक्तीशाली
  • कृत्रिम सूर्याचे तापमान १६ कोटी डिग्री सेल्सिअस १०० सेंकदपर्यंत कायम राहिले

नवी दिल्ली :   आपण म्हणतो की, या ब्रह्मांडमध्ये असलेल्या प्रत्येक घटकाच्या जीवनसाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे. पण ही नैसर्गिक असलेली गोष्ट किती काळ आपली चकम दाखवेल, सूर्याचं वय किती असेल, असा प्रश्न आपल्याला मनात नक्की येत असतो. या प्रश्नांचं उत्तर विज्ञानाकडे आहे. अशात चीनने दावा केलाय की, त्यांनी कृत्रिम सूर्य बनवला आहे.  

खऱ्या सूर्यापेक्षा दहा पट शक्तीशाली आहे

डेली मेलच्या एक रिपोर्टनुसार, चीनने तयार केलेला सूर्य हा खऱ्या सूर्याच्या तुलनेने १० पटीने शक्तीशाली आहे, म्हणजे अधिक प्रकाश देणार आहे. १० सेंकदात कृत्रिम सूर्याचा तापमान १६ कोटी डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहतलं होता. याचाच अर्थ असा की, नैसर्गिक सूर्यापेक्षा दहा पट या सूर्याचे तापमान १०० सेंकदापर्यंत राहू शकते.

तापमान स्थिर राखण्याचे आहे उद्दिष्ट 

शेंजेन मध्ये असलेल्या दक्षिणी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे संचालक ली मियाओ म्हणतात की, पुढील काही आठवड्यापर्यंत स्थिर तापमानावर आम्हाला आमचा प्रोजेक्ट चालवायचा आहे. १०० सेंकदापर्यंत १६ कोटी डिग्रीचे तापमान राखणे हेपण एक यश आहे. 

(न्यूक्लियर फ्यूजन) विभक्त संलयन तंत्रज्ञानाचा वापर

चीनच्या अनहुई राज्याच्या रिक्टरमध्ये या कृत्रिम सूर्य बनविण्यात आला आहे. यात न्यूक्लियर फ्यूजनची मदत घेण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाने हायड्रोजन बॉम्ब बनवला जातो यात प्लाज्माच्या फ्यूज करण्याच्या  स्ट्रांग मॅग्नेटिक फिल्डचं निर्माण केलं जात असून यातून तापमानाची निर्मिती केली जाते. 

फ्रान्समध्येही न्यूक्लियर फ्यूजनवर काम होतंय

फ्रान्समध्येही न्यूक्लियर फ्यूजनवर काम केले जात आहे, सांगितले जात आहे की, फ्रान्सचं प्रोजेक्ट २०२५ मध्ये पूर्ण होईल. चीनशिवाय कोरिया पण केएसटीएआरच्या मार्फत कृत्रिम सूर्य बनवण्यात यशस्वी झाला आहे. त्यातन २० सेंकदासाठी १० कोटी डिग्री सेल्सिअस तापमान स्थिर करण्यात आले होते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी