एकाच इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Crime: गुरुग्राममध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

the person living in the same building did unnatural sexual abuse on a student studying in 8th standard   
एकाच इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • अल्पवयीन मुलावर बलात्कार, आरोपी फरार
  • आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
  • आरोपी पीडित मुलगा राहत असणाऱ्या इमारतीतच राहणारा

गुरुग्राम: राजधानी दिल्लीजवळील गुरुग्राम मधील सेक्टर ५६ मध्ये एका सोसायटीत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एका बाउंसरने अनैसर्गिक सेक्स करत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित विद्यार्थी हा संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी आपल्या इमारतीच्या खालच्या परिसरात गेलेला असतानाच त्याच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडित विद्यार्थी हा पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये राहत आहे. यावेळी इमारतीचे सुरक्षा रक्षक हीटरजवळ शेकत बसले होते. त्याचवेळी पीडित मुलगा देखील शेकण्यासाठीत त्यांच्या इथे गेला. तेव्हा आरोपी अमित कुमार हा देखील त्याच ठिकाणी आला आणि या सगळ्यांसोबत बसून राहिला. आरोपी हा त्याच इमारतीत आठव्या मजल्यावर राहतो. 

याबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी सुमित कुमार असं म्हणाले की, 'जेव्हा पीडित विद्यार्थी हा घरी परतत होता तेव्हा आरोपीने त्याला तिसऱ्या मजल्यावरच रोखलं. विद्यार्थी  पायऱ्या चढून पाचव्या मजल्यावर चालला होता. त्यावेळी आरोपी लिफ्टने तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचला आणि त्याने मुलाला लिफ्टमध्ये ओढून घेतलं. त्यानंतर त्याने मुलाला आपल्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.' 

दरम्यान, यावेळी पीडित मुलाने कशीबशी आरोपीच्या तावडीतून आपली सुटका केली आणि तो आपल्या घरी परतला. यानंतर त्याने संपूर्ण प्रकाराबाबत आपल्या आई-वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्याच्या पालकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्थानकात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. दरम्यान, पोलीस पोहचण्याआधीच आरोपीने सोसायटीमधून पळून गेला होता. 

यावेळी पोलिसांनी सोसायटीमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासलं आहे. तसंच सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांची जबानी देखील घेतली आहे. पोलिसांनी आरोपी अमितकुमार विरुद्ध बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे पीडित विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. आपण राहत असलेल्या ठिकाणीच जर मुलं सुरक्षित नसतील तर नेमकं काय करायचं? असा प्रश्न आता या भागातील नागरिकांना पडला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी