muslim population in India : भारतात मुस्लिमांची संख्या दिवसेगणिक वाढतच चालली आहे. जर ही अशीच परिस्थिती राहिली तर कोणतेही संकट येऊ शकते, असा दावा विश्व हिंदू परिषदेचे (विहिप) कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी केला आहे. एनएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले की, भारतात हिंदूंच्या लोकसंख्येचा दर कमी होत आहे, तर मुस्लिमांच्या बाबतीत हा दर झपाट्याने वाढत आहे. (The population of Muslims in India is growing rapidly)
पुढे ते चिंता व्यक्त करत म्हणाले की, जर परिस्थिती (लोकसंख्येशी संबंधित) अशीच राहिली तर सध्याचा समतोल बिघडेल आणि देशात विविध प्रकारची संकटे निर्माण होतील.” कुमार यांनी समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याबाबतही सांगितले.
अधिक वाचा : 7 दिवसात मिळवा सिक्स पॅक अॅब्स, बेडवर करु शकता हे 5 व्यायाम
कुमार यांच्या मते, "भारतातील सर्व लोकांनी कुटुंब नियोजनाचे पालन केले पाहिजे. तसेच मुस्लिम धर्मात असे बरेच लोक आहेत, जे अधिकाधिक मुले जन्माला घालण्यास सांगतात. हे करण्यामागे ते धर्माचे नाव पुढे करतात. अशा धारणा बदलल्या पाहिजेत आणि प्रत्येकाने पुढे येऊन देशाच्या भल्यासाठी काम केले पाहिजे.
अधिक वाचा : गरोदरपणात का खाऊ वाटतात आंबट पदार्थ
खरं तर, UCC च्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांसाठी एकसमान नियम आणि कायदे असावेत. मग ते लग्नाशी संबंधित असो किंवा मूल दत्तक घेण्याशी संबंधित असो... मालमत्तेच्या विभाजनासारख्या बाबतीतही कायदे आणि नियम सर्वांसाठी समान असतील. म्हणजेच जात-धर्म-परंपरेनुसार या अंतर्गत कोणालाही सवलत मिळणार नाही.
अधिक वाचा : या नैसर्गिक उपयांनी चेहऱ्यावरील केसं होतील गायब