मित्राचं ऐकून बायकोसोबत 'नको' ते करायचा, वैतागून तिने lipstick च्या साहाय्याने भिंतीवर लिहिली नोट

Ranchi Suicide: मृत चंदाच्या आईने सांगितले की, चंदाचा पती दिलीप चौहान याला दुसऱ्या मुलीशी लग्न करायचे होते, त्याबद्दल दिलीपचा मित्र पिंटू त्याला प्रोत्साहन द्यायचा. त्याचबरोबर सासू, ननंदही तिला सतत त्रास देत असत.

The woman committed suicide by writing a note on the wall with lipstick,
Dowry साठी बेल्टने मारायचा, तिने लिपस्टिकने भिंतीवर लिहिलेली नोट वाचून पोलिसांच्या पायखालची वाळू सरकली ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लिपस्टिकने भिंतीवर चिठ्ठी लिहून महिलेने केली आत्महत्या
  • महिलेने तिच्या खोलीच्या भिंतीवर लिपस्टिकने सुसाईड नोट लिहली

Woman suicide note : झारखंडची राजधानी रांचीमधून आत्महत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे बुधवारी 26 वर्षीय महिलेने तिच्या खोलीच्या भिंतीवर लिपस्टिकने सुसाईड नोट लिहून घरात गळफास लावून घेतला. राज्याची राजधानी रांचीपासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या डकरा गावातील चंदा देवी असे मृत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती दोन मुलांची आई असून पतीकडून घरातील छळाला कंटाळून तिने हे संतापजनक पाऊल उचलले. पोलिसांनी सांगितले की, महिलेने तिच्या सुसाईड नोटमध्ये तिच्या आत्महत्येसाठी पती दिलीप चौहान आणि सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे.

चंदाने 2019 मध्ये दिलीपसोबत प्रेमविवाह केला होता. लग्न झाल्यापासून चंदा हिचा पती व सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी सतत छळ होत होता. चंदाच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेने पती आणि सासरच्या लोकांची नावे भिंतींवर लिहिली असून ती वैतागली असल्याचे तिने लिहिले आहे.

मृताच्या आईने सांगितले की, चंदाचा पती दिलीप याला दुसऱ्या मुलीशी लग्न करायचे होते, त्याबद्दल दिलीपचा मित्र पिंटू त्याला सतत भडकावत असे. त्याचबरोबर सासू, नंदनही तिला सतत त्रास देत असत. मृत चंदा हिला दोन लहान मुली असून एक 2 वर्षाची तर दुसरी एक वर्षाची आहे. मयताच्या पाठीवर जखमेच्या खुणा असून पाठीवर बेल्टने मारहाण केल्याच्या गंभीर खुणा असल्याचे सांगितले. पोलिसांनी सुसाईड नोट आणि चंदाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी