Ram Temple: जगातील सर्वात मोठे कुलुप राम मंदिराला मिळणार भेट; ३० किलोच्या चावीने खुलणार

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 10, 2022 | 19:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ram Temple | कुलुपांसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात अलिगढच्या सत्यप्रकाश यांनी पत्नी रुक्मणीसह जगातील सर्वात मोठे कुलूप बनवले आहे. ३० किलोच्या चावीने उघडणारे हे कुलूप हे जोडपे अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या भगवान श्री राम मंदिराला समर्पित करणार आहेत.

The world's largest lock will be given to the Ram temple and will be opened with a 30 kg key
जगातील सर्वात मोठे कुलुप राम मंदिराला मिळणार भेट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या कुलुपाला बनवण्यासाठी जवळपास ६ महिन्यांचा कालावधी लागला आहे.
  • ३० किलोच्या चावीला बनवण्यासाठी एकूण दोन लाख खर्च आला आहे.
  • कुलुप बनवणाऱ्या शर्मा यांनी म्हटले की, २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये त्यांना एका मोठ्या कुलुपाची प्रतिकृती बनवायची आहे.

Ram Temple | अलीगढ : कुलुपांसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात अलिगढच्या (Aligarh) सत्यप्रकाश यांनी पत्नी रुक्मणीसह (Satyaprakash Sharma And His Wife) जगातील सर्वात मोठे कुलूप बनवले आहे. ३० किलोच्या चावीने उघडणारे हे कुलूप हे जोडपे अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या भगवान श्री राम मंदिराला समर्पित करणार आहेत. दरम्यान दोन लाखांच्या या कुलुपावर रामदरबाराची प्रतिकृती कोरण्यात आली आहे. अलिगढ मधील ज्वालापुरी येथील रहिवासी असलेल्या सत्यप्रकाश यांनी सांगितले की, हे कुलुप बनवण्यासाठी जवळपास ६ महिन्यांचा कालावधी लागला आहे. (The world's largest lock will be given to the Ram temple and will be opened with a 30 kg key). 


 कुलुपाची वैशिष्ट्ये (Features of the lock)

१. या कुलुपाला बनवण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागला आहे. या कुलुपाचे वजन चारशे किलो एवढे आहे. त्याची लांबी दहा फुट आहे आणि रूंदी साडे चार फुट आहे. 

२. हे कुलूप उघडण्यासाठी ३० किलोची चावी असून ती बनवण्यासाठी एकूण दोन लाखांचा खर्च आला आहे. मात्र आता एक लाख रुपयांत बनवण्यात आली आहे.

३. मंदिराला हे समर्पित करण्यापूर्वी सत्यप्रकाश यामध्ये पितळेचे काम करणार आहेत. यापूर्वी त्यांनी ३०० किलोचे कुलुप बनवले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती. 

बदल केला जाणार 

दरम्यान, कुलुप बनवणाऱ्या सत्यप्रकाश यांनी सांगितले की, अयोध्येला पाठवण्यापूर्वी या कुलुपामध्ये अनेक बदल केले जातील. बॉक्स, लीव्हर, हुड पितळेचे बनविले जाईल. कुलुपावर एक स्टील स्क्रॅप सीट स्थापित केली जाईल. जेणेकरून त्याला गंज लागणार नाही. यासाठी त्यांना अधिक पैशांची गरज आहे. ते अधिक पैशाच्या मदतीसाठी लोकांना विचारत आहेत. जेणेकरून त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल. शर्मा यांनी सांगितले की, हे कुलुप बनवण्याची प्रेरणा त्यांच्या घरातूनच मिळाली होती. 

प्रसिध्द आहेत सत्यप्रकाश

६५ वर्षीय सत्यप्रकाश मजुरीवर कुलुप तयार करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी या व्यवसाय क्षेत्रात त्यांची बरीच ओळख निर्माण केल्याचे सांगितले आहे. आता या व्यवसायाला नवीन पिढीने उभारी दिली पाहिजे. अलीगढची ओळख निर्माण करण्यासाठी जगातील सर्वात मोठे कुलुप तयार करण्यात आले आहे. सहा इंच जाडीचे हे कुलूप लोखंडाचे आहे. यासाठी दोन चाव्या तयार करण्यात आल्या आहेत. तब्बल चार फुटांचे कुलुप आहे. या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे. आता केलेले काम व्याजाने पैसे घेऊन पूर्ण केले आहे. हे कुलूप मंदिराच्या संग्रहालयात ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

दिल्लीच्या परेडमध्ये सहभागी करायचे आहे 

कुलुप बनवणाऱ्या शर्मा यांनी म्हटले की, २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये त्यांना एका मोठ्या कुलुपाची प्रतिकृती बनवायची आहे. त्यांच्या या कौशल्याचा दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये समावेश व्हायला हवा. ज्याची उंची १५ फुट आणि रुंदी ८ फुट असेल. जाडी  २० इंच असेल. त्यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांशी पत्रही लिहिली आहेत. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली आहे. मात्र ते अद्यापही उत्तराच्या प्रतिक्षेत आहेत. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व्हावी, असे त्याचे म्हणणे आहे. सत्यप्रकाश यांच्या पत्नी रुक्मणी शर्मा यांनीही हे कुलूप बनवण्यात खूप मदत केली आहे. त्याच्या गुणवत्तेबद्दलही ते बोलले. ते म्हणतात की, अयोध्येत रामाचे अप्रतिम मंदिर बांधले जात आहे. तेथे हे कुलूप असल्यास चांगले होईल. त्यामुळे देवाच्या दरबारात सादर करण्यात येणार आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी