Crime news : सुपारी फुटल्यानंतर वराने लग्नापूर्वी केली अशी काही मागणी, ऐकून वधू पक्षाचा बसला धक्का, लग्न मोडलं

man demanded physical relation : यूपीच्या बरेलीमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने लग्नाआधी आपल्या भावी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मात्र मुलीने ते मान्य केले नाही. याचा राग येऊन तरुणाने लग्न मोडले.

। The young man demanded physical contact before the wedding, and the bride's party was shocked
Crime new : सुपारी फुटल्यानंतर वराने केली लग्नापूर्वी केली शरीर सुखाची मागणी, ऐकून वधू पक्षाचा बसला धक्का   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सुपारी फुटल्यानंतर वराने केली लग्नाआधी अशी मागणी
  • ऐकून नवरीलाही धक्का बसला, लग्न मोडलं
  • हे प्रकरण बरेलीच्या इज्जत नगर पोलीस स्टेशन परिसरातील देलापीरचे आहे.

man demanded physical relation  । बरेली : यूपीच्या बरेलीमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणावर आरोप करण्यात आला आहे की, त्याला लग्नाआधी आपल्या भावी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मात्र मुलीने ते मान्य केले नाही. याचा राग मनात ठेवून तरुणाने लग्न मोडले. त्याचबरोबर पाश्चिमात्य संस्कृतीच्या नशेत धुंद झालेल्या तरुणांना धडा शिकवण्याचा निर्धार मुलीच्या कुटुंबियांनी घेतला आहे. तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी पोलिसांना केली आहे. (TThe young man demanded physical relation before the wedding, and the bride's party was shocked)

नेमके काय झाले?

हे प्रकरण बरेलीच्या इज्जत नगर पोलीस स्टेशन परिसरातील देलापीरचे आहे. येथे राहणाऱ्या ज्योतीचे लग्न बिहारीपूरच्या संजीवसोबत निश्चित झाले होते. लग्नाची तयारी चालू होती. 25 नोव्हेंबरला मिरवणूक येणार होती, मात्र संजीवने लग्नापूर्वी संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला, मात्र मुलीने नकार दिला. यामुळे संतापलेल्या मुलाने लग्नास नकार दिला.

लग्नपत्रिका वाटण्यात आल्या 

मुलीच्या भावाने सांगितले की, लग्नपत्रिका वाटण्यात आल्या आहेत. लग्नासाठी मॅरेज हॉलही बुक करण्यात आला आहे. दागिने, कपडे खरेदी केले आहेत. 14 ऑक्टोबर रोजी संजीव मुलीला हॉटेलमध्ये घेऊन गेला, असा आरोप वधूच्या भावाने केला आहे. तेथे त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, ज्याला मुलीने प्रतिकार केला आणि कसा तरी तेथून पळ काढला.

लग्न मोडले

त्याचवेळी तरुणाच्या घरच्यांना ही बाब कळताच त्यांनीही मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. असे असूनही त्याने ऐकले नाही आणि नाते संपुष्टात आणण्याबाबत बोलताना त्याने बरेच काही सांगितले. त्याचवेळी लग्न मोडल्यानंतर तरुणीच्या तक्रारीवरून इज्जत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल

बरेलीचे एसपी सिटी रविंदर सिंह यांनी सांगितले की, एका तरुणीने तक्रार दिली होती की, लग्नाचे कारण देत मुलाने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. याशिवाय हुंड्याचीही मागणी केली जात होती. विरोध केल्यावर मुलांनी लग्नास नकार दिला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असून, जे काही पुरावे येतील त्याआधारे कारवाई केली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी