देशात सध्या एकही ‘ओमिक्रॉन’चा रुग्ण नाही ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Omicron  Crisis :  संपूर्ण जगावर सध्या कोरोना (Corona)चा नवा विषाणू ओमिक्रॉनने (Omicron ) भीतीचे वातावरण  निर्माण केले आहे. अशा भीतीच्या वातावरणात केंद्रीय आरोग्यमंत्री (Union Health Minister ) मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) यांनी देशवासियांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे

There is currently no Omicron patient in the country
देशात सध्या एकही ‘ओमिक्रॉन’चा रुग्ण नाही - मांडविया   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉन (B.1.1.529) सर्वात प्रथम दक्षिण अफ्रिकेत आढळला.
  • दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवेवर परिणाम झाला आहे.
  • दक्षिण अफ्रिकेतील देशांतून होणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घालू नये,- जागतिक आरोग्य संघटना

Omicron  Crisis :  नवी दिल्ली : संपूर्ण जगावर सध्या कोरोना (Corona)चा नवा विषाणू ओमिक्रॉनने (Omicron ) भीतीचे वातावरण  निर्माण केले आहे. अशा भीतीच्या वातावरणात केंद्रीय आरोग्यमंत्री (Union Health Minister ) मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) यांनी देशवासियांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचा (Omicron ) एकही रुग्ण आढळला नसल्याचे माहिती राज्यसभेत दिली. संसदेच्या (Parliament) हिवाळी अधिवेशनातील ( winter session ) राज्यसभेत (Rajya Sabha) प्रश्नोत्तराच्या सत्रात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉन (B.1.1.529) सर्वात प्रथम दक्षिण अफ्रिकेत आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे.

अफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. दक्षिण अफ्रिकेत कोरोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. यामुळे दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवेवर परिणाम झाला असून कडक लॉकडाउनची भीती सतावत आहे. भारतातूनही हवाई वाहतूक बंद केली जावी अशी मागणी होत आहे. दरम्यान कोरोनाच्या ओमिक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या भीतीपोटी दक्षिण अफ्रिकेतील देशांतून होणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घालू नये, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने रविवारी जगभरातील देशांना केले. प्रवासविषयक निर्बंध टाळण्यासाठी विज्ञानविषयक आणि आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन डब्ल्यूएचओचे अफ्रिकेसाठीचे विभागीय संचालक मात्शिदिसो मोएती यांनी सर्व देशांना केले.

‘प्रवासविषयक निर्बंध करोना विषाणूचा फैलाव काहीसा कमी करण्यात भूमिका बजावू शकतात; मात्र त्यांच्यामुळे जीवन आणि उपजीविका यांवर फार मोठा बोझा पडतो’, असे त्यांनी एका निवेदनात सांगितले. 

आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज राज्यसभेत बोलताना सांगितले की, “कोरोना संकटात आपण खूप काही शिकलो असून आज आपल्याकडे अनेक संसाधने, प्रयोगशाळा आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना आपण करू शकतो. दरम्यान आजच्या घडीला देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या कोणत्याही रुग्णाची नोंद झालेली नाही. याशिवाय हा नवा विषाणू देशात, येऊ नये यासाठी संभाव्य प्रत्येक काळजी घेतली जात आहे”.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी