“हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत,” सरसंघचालक मोहन भागवत

हिंदूंशिवाय भारत (India) नाही आणि भारताशिवाय हिंदू (Hindu) नाहीत असं वकव्य सरसंघचालक मोहन भागवत (Sarsanghchalak Mohan Bhagwat) यांनी केले आहे. भारत आणि हिंदूंना वेगळे केले जाऊ शकत नाही असेही ते म्हणाले आहेत

Sarsanghchalak Mohan Bhagwat
हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत- भागवत   |  फोटो सौजन्य: Twitter

ग्वालियर  : हिंदूंशिवाय भारत (India) नाही आणि भारताशिवाय हिंदू (Hindu) नाहीत असं वकव्य सरसंघचालक मोहन भागवत (Sarsanghchalak Mohan Bhagwat) यांनी केले आहे. भारत आणि हिंदूंना वेगळे केले जाऊ शकत नाही असेही ते म्हणाले आहेत. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वालियर (Gwalior) येथे आयोजित एका कार्यक्रमत ते बोलत आहेत. भारत हा स्वत:च्या तत्त्वावर आधारलेला असून 'हिंदुत्व' हे भारताचे तत्व असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. “भारत आपल्या पायांवर स्वत: उभा राहिला. हेच हिंदुत्वाचं सार आहे, याच कारणामुळे भारत हिंदूंचा देश आहे,” असं मोहन भागवत म्हणाले आहेत.

मोहन भागवत यांनी यावेळी फाळणीचा उल्लेख करत म्हटले की, “फाळणीनंतर भारताचे तुकडे झाले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. आपण हिंदू आहोत ही संकल्पना विसरल्यामुळेच हे झाले. तेथील मुस्लीमदेखील हे विसरले होते. आधी स्वतःला हिंदू समजणाऱ्यांची ताकद कमी झाली, नंतर त्यांची संख्या कमी झाली. म्हणूनच पाकिस्तान भारताचा भाग राहिला नाही”. मोहन भागवत यांनी यावेळी हिंदूंची संख्या कमी होत असल्याचे म्हटले. “हिदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे किंवा हिंदुत्वाची भावनाच कमी होत आहे. 

"आपल्याला दिसेल की हिंदूंचे सामर्थ्य आणि संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. किंवा हिंदुत्वाबद्दलची भावना कमी होताना आपल्याला दिसत असेल. हिंदूंना हिंदू म्हणून राहायचं असेल तर अखंड भारत राहायला पाहिजे, असं त्यांनी अधोरेखित केलं.याआधी मोहन भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना फाळणीच्या वेळी भारताने सहन केलेल्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असं म्हटलं होतं.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी