चहामध्ये कमी साखर टाकल्याने नवऱ्याने गरोदर बायकोची गळा चिरुन केली हत्या 

Pregnant Wife Murder Crime News: उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे एका व्यक्तीने कमी साखर असलेला चहा दिल्यामुळे आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Murder
क्षुल्लक कारणावरुन पत्नीची हत्या (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • यूपीमध्ये एका व्यक्तीने चहाच्या वादातून पत्नीची हत्या केली.
  • चहामध्ये साखर कमी असल्यामुळे बायकोशी घातला वाद
  • वादादरम्यान घरातील चाकूने पत्नीची गळा चिरुन केली हत्या 

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) फक्त या कारणासाठी केली की, तिने त्याला कमी साखर असलेला चहा दिला. चहामध्ये कमी साखर टाकल्याने संतापलेल्या पतीने आधी आपल्या पत्नीशी या गोष्टीवरुव जोरदार भांडण केलं आणि नंतर चाकूने तिचा गळा चिरला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुलांनी आईला पाहिलं रक्ताच्या थारोळ्यात 

मिळालेल्या माहितीनुसार एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. जिचं वय सुमारे ३५ वर्ष होतं आणि ती गरोदर देखील होती (Pregnant Wife). दोघांचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्यांची मुले झोपली होती. जेव्हा पती-पत्नीचं भांडण सुरु झालं तेव्हा त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने मुलं जागी. मुलं आपल्या खोलीतून स्वयंपाकघरात जाईपर्यंत बराच उशीर झाला होता. कारण तोवर त्यांच्या बापाने त्यांच्या आईचा गळा चिरला होता. जेव्हा मुलं स्वंयपाकघरात पोहचली त्यावेळी त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. हे दृश्य पाहून मुलांना प्रचंड धक्का बसला.

चहावरुन झाला वाद

किरकोळ वादातून पतीने अत्यंत टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. वृत्तानुसार, सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास महिलेने आपल्या पतीला चहा दिला. परंतु त्यात साखर कमी होती. त्यामुळे महिलेचा नवरा तिच्यावर प्रचंड चिडला आणि तिला वाट्टेल तसं बोलू लागला. यामुळे दोघांमध्ये खूप वाद झाला. त्यानंतर पतीने किचनमधील चाकूने थेट पत्नीचा गळा चिरुन तिची हत्या केली. यानंतर तो तिथून फरार झाला. 

महिलेच्या वडिलांनी दाखल केली तक्रार 

मृत महिलेच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. एवढ्या छोट्या गोष्टीवरुन जावयाने आपल्या मुलीची हत्या करावी याच गोष्टीचं ते खरं तर हादरुन गेले आहेत. खरं तर ते आपल्या जावयाला समजूतदार समजत होते. याप्रकरणी पोलिसांनी जोडप्याच्या मुलांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच हत्येमध्ये वापरलेलं शस्त्रही जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.  (there was less sugar in the tea the person got angry on the wife then brutally killed)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी