Water in Space: ऐकलं का ! पृथ्वीच्या आधीही सूर्यमालेत होते पाणी, उल्कापिंडाने उघडले लाखो वर्ष जुने रहस्य

पाणी (water) हा जीवनासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. पृथ्वीवर (Earth) जीवसृष्टीचा (Creatures) उदय कसा झाला हे आपल्याला माहीत नाही. पण, पाण्याशिवाय जीवन अजिबात शक्य नाही, हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. आत्तापर्यंत, पृथ्वी हा एकमेव ग्रह(Planet) आहे जिथे जीवन अस्तित्वात आहे.

Earth
उल्कापिंडाने उघडले सूर्यमालेतील लाखो वर्ष जुने रहस्य  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पृथ्वीशिवाय इतर अनेक ग्रहांवर पाणी असण्याची शक्यता जास्त आहे.
  • पृथ्वी तयार होण्यापूर्वीच आपल्या सूर्यमालेत पाणी

वॉशिंग्टन : पाणी (water) हा जीवनासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. पृथ्वीवर (Earth) जीवसृष्टीचा (Creatures) उदय कसा झाला हे आपल्याला माहीत नाही. पण, पाण्याशिवाय जीवन अजिबात शक्य नाही, हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. आत्तापर्यंत, पृथ्वी हा एकमेव ग्रह(Planet) आहे जिथे जीवन अस्तित्वात आहे. आपल्या ग्रहावर द्रव पाणी मुबलक प्रमाणात आढळते. आता हे पाणी कुठे आणि कसे आले, याविषयी अनेक प्रश्न आहेत. आता नवीन संशोधनात असे दिसून आले आहे, की पृथ्वी तयार होण्यापूर्वीच आपल्या सूर्यमालेत (solar system ) पाणी होते.

पुरातन उल्कापात सापडले पाण्याचे पुरावे 

फ्रेंच नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे जिओकेमिस्ट जेर्मे अॅलन यांच्या नेतृत्वाखालील टीमने पाण्यावर संशोधन केले आहे. त्यांच्या टीमच्या म्हणण्यानुसार, सूर्यमालेच्या जन्मादरम्यान तयार झालेल्या उल्कांमधील पाण्याचे समस्थानिक (आइसोटोप) आज पृथ्वीवर आढळणाऱ्या पाण्याच्या समस्थानिकेशी(आइसोटोप) जुळतात. संशोधकांनी त्यांच्या शोधनिबंधात लिहिले आहे की, सूर्यमालेतील पाण्याची प्रारंभिक समस्थानिक (आइसोटोप) रचना ही सौरमालेतील ग्रहांवर पाण्याची उत्पत्ती समजून घेण्यासाठी सर्वोत्तम माध्यम आहे.

हायड्रोजन समस्थानिक (आइसोटोप) रचनाने उलगडले रहस्य

टीमने सांगितले की, आमच्या संशोधनात आम्हाला सौरमालेच्या निर्मितीच्या सुरुवातीला तयार झालेल्या आदिम उल्कापिंडांवर पाण्याची हायड्रोजन समस्थानिक रचना आढळून आली. कॅल्शियम-अ‍ॅल्युमिनियमने समृद्ध असलेल्या या आदिम उल्कापिंडांमध्ये हायड्रोजनची समस्थानिक रचना वापरली जाते. काही प्रकारच्या उल्का सूर्यमालेच्या जन्मापासून टाइम कॅप्सूल म्हणून काम करत असतात. रेडिओमेट्रिक डेटिंग सूचित करते की, पृथ्वीची निर्मिती 4.54 अब्ज वर्षांपूर्वी झाली होती. कझाकिस्तानमध्ये 1962 मध्ये सापडलेल्या एफ्रेमोव्हका उल्कामध्ये 4.57 अब्ज वर्षांपूर्वीचे घटक आहेत. या उल्कापिंडात कॅल्शियम आणि अॅल्युमिनियम भरपूर होते. याचे विश्लेषण अॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नव्या तंत्राद्वारे केले आहे. उल्कापिंडाच्या पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी केलेल्या आयन बीम इमेजिंगचा उपयोग तुकड्यात उपस्थित सर्व खनिजे ओळखण्यासाठी आणि तपासण्यासाठी केला आहे. 

पृथ्वीच्या आधी सूर्यमालेत पाणी होते

या संपूर्ण संशोधनादरम्यान पृथ्वीच्या आधीही अनेक भागावर पाणी असल्याचे समोर आले आहे. त्यांचे समस्थानिक सध्या पृथ्वीवर असलेल्या पाण्याच्या समस्थानिकांशी बरेच साम्य असल्याचे आढळून आले आहे. या संशोधनाच्या आधारे असा दावा करण्यात आला आहे की, पृथ्वीशिवाय इतर अनेक ग्रहांवर पाणी असण्याची शक्यता जास्त आहे. अलीकडेच मंगळावर वाहणाऱ्या पाण्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी