18 वर्षांचे असले तरीही या लोकांनी घेऊ नये कोरोनाची लस, जाणून घ्या काय आहेत यामागची कारणे

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 29, 2021 | 14:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र असेही काही लोक आहेत ज्यांना काही वैद्यकीय समस्या आहेत आणि ज्यांनी सध्या लस घेऊ नये. जाणून घ्या कोणी घेऊ नये कोरोनाची लस.

Corona vaccine
18 वर्षांचे असले तरीही या लोकांनी घेऊ नये कोरोनाची लस, जाणून घ्या काय आहेत यामागची कारणे  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • जाणून घ्या कोणत्या लोकांनी घेऊ नये कोरोनाची लस
  • लसीच्या दोन्ही मात्रा एकच असाव्यात- कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशील्ड
  • कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल तर लस घेऊ नये

नवी दिल्ली: कोरोना वायरसचे (Corona virus) वेगाने वाढणारे संक्रमण (infection) लक्षात घेता भारत सरकारने (Indian government) लसीकरण मोहिमेचा (vaccination drive) वेग (speed) वाढवला आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. मात्र लसीकरणाबाबत (vaccination) काही लोकांच्या मनात अद्यापही काही शंका (doubts) आहेत. याचे कारण असे की काही लोकांना लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट्स (side effects) दिसून येत आहेत. काही लोकांचा तर मृत्यूही (deaths) झाला आहे. अशा परिस्थितीत कोणी ही लस घेऊ नये याबाबतची माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत.

लसींची आदलाबदली करू नका

सध्या भारतात दोन लसींचा वापर केला जात आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की आहे कोणत्या लोकांनी लस घेऊ नये. तसेच त्यांनी असेही सांगितले आहे की लसींच्या डोसची आदलाबदल होऊ नये. म्हणजेच लसीची पहिली आणि दुसरी मात्रा ही कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी एकाच लसीची असावी.

या लोकांनी घेऊ नये कोरोनाची लस

  1. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीने लस घेऊ नये.
  2. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी कोरोनाची लस घेऊ नये. याचे कारण हे की आत्तापर्यंत गर्भवती किंवा स्तनदा महिलांचा समावेश लसीच्या चाचण्यांच्या प्रक्रियेत नव्हता. त्यामुळे लसीचा त्यांच्यावर कसा परिणाम होऊ शकतो याबाबत स्पष्टता नाही.
  3. जर चाचणीत सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोव्हिड-19च्या लसीमुळे कोणतीही अॅलर्जी झाली किंवा पहिला डोस घेतल्यानंतर अॅलर्जिक रिअॅक्शन दिसून आली तर पुढे लस घेऊ नये.
  4. ज्या लोकांमध्ये कोव्हिड-19ची सक्रीय लक्षणे दिसत आहे त्यांनीही संसर्गातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर 4 ते 8 आठवड्यानंतरच लस घ्यावी.
  5. जर आपल्याला ताप, ब्लीडिंगची समस्या किंवा रक्ताशी संबंधित कोणताही आजार असेल किंवा जर आपण रक्त पातळ करण्याची औषधे घेत असाल तर कोरोनाची लस घेऊ नका.
  6. ज्या कोरोनारुग्णांवर प्लाझ्मा थेरपी किंवा अँटीबॉडीजच्या सहाय्याने उपचार केले जात आहेत त्यांनीही बरे झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनीच लस घ्यावी.
  7. ज्या लोकांना प्लेटलेट्सचा आजार असेल किंवा ज्यांची रोगप्रतिकारशक्ती फारच दुर्बल असेल आणि यासाठी ते औषधे घेत असतील त्यांनीही कोरोनाची लस घेऊ नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी