Russia-NATO conflict : नवी दिल्ली : सध्या जगात एखाद्या राष्ट्रप्रमुखाची सर्वाधिक चर्चा असेल तर ते म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin). रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) सर्वच जगाचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले आहे. पुतिन यांच्या फ्लर्टिंगचे किस्से सतत समोर येत आहेत. त्यांच्या मध्यमवयीन जिम्नॅस्ट गर्लफ्रेंडची खूप चर्चा आहे. पण पुतिन सध्या दोन महिलांमुळे खूप त्रस्त आहेत. सना मरिनचे नाव तुम्ही ऐकले असेलच. फिनलंडच्या (Finland) पंतप्रधान सना मरिन (Sana Marin)या 36 वर्षांच्या आहेत. त्या देशाचे नेतृत्व करणारी जगातील सर्वात तरुण नेत्या आहेत. त्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आहेत. आता इव्हा मॅग्डालेना अँडरसनबद्दल (Eva Magdalena Anderson) बोलूया. त्या फिनलंडचा शेजारी देश स्वीडन (Sweden) पंतप्रधान आहेत. 55 वर्षीय इवा सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्याही आहेत. या दोन महिला पंतप्रधानांची सध्या जगभर चर्चा होत आहे. खरे तर सना मरिन आणि इवा मॅग्डालेना यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या चांगलेच नाकी नऊ आणले आहे. पुतिन यांच्या धमक्यांना झुगारून उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटो (NATO) मध्ये सामील होण्याचा इरादा दोघांनीही जाहीर केला आहे. (These two women have given lessons to Russian President Vladimir Putin)
अधिक वाचा : Lalu Yadav Cbi Raid : सीबीआयने दिल्ली-पाटणासह लालू यादवांच्या 17 ठिकाणांवर टाकले छापे
या दोन प्रगत देशांच्या या निर्णयाने जगातील सर्वात मोठा अण्वस्त्रांचा साठा असलेल्या रशियाला हादरा दिला. न्यूक्लियर कमांडचे केंद्र असलेले व्लादिमीर पुतिन हे संकटात आहेत. दुसरीकडे आठवडाभरातच युक्रेनचा नायनाट करण्याची फुशारकी मारणाऱ्या पुतिन यांच्या सैन्याला त्यांच्या अपेक्षेनुसार यश आलेले दिसत नाही. 24 मे रोजी, युक्रेनवरील हल्ल्याला तीन महिने पूर्ण होतील, परंतु डॉनबास पूर्णपणे ताब्यात घेण्यात रशियाला यश आलेले नाही. झेलेन्स्कीच्या सैनिकांनी रशियन सैन्याला मारियुपोल येथील स्टील प्लांटमध्ये 82 दिवस पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे पुतिन यांच्या विजयाचा वेग इतका कमी आहे की, जगातील अनेक संरक्षण तज्ज्ञ याला रशियाचा पराभव म्हणत आहेत.
अधिक वाचा : AIR Force Global Ranking: भारताने चीनला टाकले या बाबती मागे, पटकावले मानाचे स्थान
आता या अवस्थेत फिनलंड आणि स्वीडनच्या दोन महिलांनी पुतिन यांच्यासाठी डोकेदुखी निर्माण केली आहे. किंबहुना, युक्रेनविरुद्ध युद्ध पुतिन यांनी दिलेल्या युक्तिवादावर त्यांनी ठाम राहिल्यास त्यांना स्वीडन आणि फिनलंडमध्येही विशेष लष्करी कारवाई सुरू करावी लागेल. पण, आता रशिया या स्थितीत आहे का? उत्तर नाही असेच आहे. पुतिन याची कल्पनाही करू शकत नाहीत. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास रशियाची सुरक्षा धोक्यात येईल, असे पुतीन यांनी युद्धाच्या युक्तिवादात म्हटले होते. पुतिन यांनी असा युक्तिवाद केला होता की अमेरिका आणि युरोपमधील 30 देशांचा समावेश असलेल्या नाटोची स्थापना सोव्हिएत युनियनच्या विरोधात झाली आणि युएसएसआरच्या विघटनानंतर आता नाटोला रशियावर दबाव ठेवायचा आहे. युक्रेनमध्ये नाटोची क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार आहेत. अर्थात हल्ल्यापूर्वी लुहान्स्क आणि डोनेत्स्क या रशियन भाषिक भागात नाझी झेलेन्स्कींनी अत्याचार केल्याचा आरोपदेखील पुतिन यांनी केला होता.
अधिक वाचा : Hyderabad Encounter : बलात्काऱ्यांवरील चकमक बनावट, SC च्या चौकशी समितीचा अहवाल, पोलिसांवर चालवला जाणार खटला
आता युक्रेनशी तुलना केल्यास फिनलंड आणि स्वीडन दोन पावले पुढे गेले आहेत. सना मारिन आणि इवा मॅग्डालेना यांनी नाटोमध्ये सामील होण्याची ऑफर पाठवली आहे. दुसरीकडे, युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन असोत किंवा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असो, संपूर्ण पाश्चात्य समूहाने ही चांगली बातमी म्हणून त्यावर उडी घेतली आहे. तुर्कस्तानने शेवटच्या क्षणी यात मोडता घातला हे रशियाचे सुदैव आहे. नाहीतर आज स्वीडन आणि फिनलँड रशियाविरुद्धच्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या आघाडीत सामील झाले असते. हे दोघेही कुर्दिश बंडखोरांना पाठिंबा देत असल्याचे तुर्कीचे म्हणणे आहे. त्यावर आधी भूमिका स्पष्ट करा असे तुर्कीचे म्हणणे आहे. आता नाटोच्या घटनेत म्हटले आहे की कोणताही निर्णय सर्व सदस्य देशांच्या संमतीने घेतला जाईल, त्यामुळे तूर्तास ब्रेक घेण्यात आला आहे. पण ते फार काळ टिकणार नाही, हेही निश्चित. कारण जरी मैदानातील युद्ध युक्रेनमध्ये सुरू असले तरी छुप्या युद्धात अमेरिका रशियाच्या विरोधात उभी आहे.